शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आणखी किती खोट्या केसेस टाकणार आहात?

By admin | Updated: May 29, 2016 01:22 IST

आम्ही निर्दोष आहोत, हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास आणि आमचे आयुष्य संपावे, नव्हे संपूर्ण भुजबळ कुटुंब संपावे असे प्रयत्न सर्व पातळ्यांवर आमचे विरोधक करीत आहेत. ५० वर्षांची

मुंबई : आम्ही निर्दोष आहोत, हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास आणि आमचे आयुष्य संपावे, नव्हे संपूर्ण भुजबळ कुटुंब संपावे असे प्रयत्न सर्व पातळ्यांवर आमचे विरोधक करीत आहेत. ५० वर्षांची आमची राजकीय आणि सामाजिक कारकिर्द आज पणाला लागलेली आहे. या वयात आम्ही किती आणि कसे लढावे हा प्रश्न आहे. बाहेर वाटेल ते आरोप करणे, बातम्या देणे सुरू आहे. त्याला तुरुंगातून उत्तर देऊ; पण आणखी किती खोट्या केसेस टाकणार आहात, असा उद्विग्न सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.राज्य शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिर्याद दाखल केल्याचे वृत्त आले आहे. आम्ही नियमितपणे आयकर विभागाला आमच्या उत्पन्नाची विवरणपत्रे सादर केलेली आहेत. तज्ज्ञांकडून पूर्ण अभ्यासाअंती याबाबत आम्ही माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, आमची मालमत्ता पूर्णत: नियमात बसणारी आहे. त्याबाबतचा सर्व व सखोल तपशील लाचलुचपत विभागाला चौकशीच्या वेळी सादर केला आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात, अतिरिक्त चटई निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी देऊन मिळणाऱ्या १०० कोटी रुपयांतून महाराष्ट्र सदन, हायमाउंट गेस्ट हाउस, आरटीओची इमारत, प्रकल्पग्रस्तांसाठी कायमस्वरूपी निवारा इत्यादी बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीचा आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे म्हणणे असे आहे की, या प्रकल्पातून आम्हाला ८०० कोटी रुपये भ्रष्टाचारात मिळाले. परंतु वास्तव हे आहे की, चमणकरांना शासनाकडून एक इंच जमीन, एफएसआय किंवा एक रुपयाही मिळालेला नाही. असे असतानाही आम्हाला मात्र ८०० कोटी रुपयांची लाच मिळाल्याचे गृहीत धरून आमच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली. केसेस केल्या आणि मालमत्ताही जप्त करायची सुरुवात केली आहे, असेही भुजबळ यांनी हाती लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

एसीबीने उपस्थित केलेल्या सर्व शंकांना आणि प्रश्नांना उत्तरेही दिलेली आहेत. परंतु नियमानुसार आमच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये ज्या गोष्टी धरावयास नको, अशा काल्पनिक गोष्टी गृहीत धरून केसेस केल्या जात आहेत, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.