शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी न केलेली प्रकरणे किती?

By admin | Updated: October 12, 2016 06:57 IST

पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्याची चौकशी करण्यासाठी संबंधित प्रकरण दंडाधिकाऱ्यांकडे नोंदवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिला

मुंबई : पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्याची चौकशी करण्यासाठी संबंधित प्रकरण दंडाधिकाऱ्यांकडे नोंदवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिला होता. मात्र काही प्रकरणांची दखल दंडाधिकाऱ्यांनी न घेतल्याची बाब निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने अशा केसेसची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.तपशीलवार माहिती मिळाल्यास आम्ही दंडाधिकाऱ्यांना निर्देश देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने म्हटले.सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मृत्यूच्या ३१ केसेस नोंदवल्या असून, २८ केसेस दंडाधिकांकडे चौकशीसाठी पाठविल्या असल्याची माहिती सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. काही दंडाधिकाऱ्यांनी केसेसची दखल घेण्यास नकार दिल्याची बाबही सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. दंडाधिकाऱ्यांकडे केस चौकशीसाठी वर्ग करण्यात येऊनही त्यांनी त्याची दखल घेण्यास नकार दिला? अशा किती केसेस आहेत, ते आम्हाला सांगा. आम्ही योग्य ते निर्देश देऊ. सात केसेसमध्ये चौकशी करण्यात आली आणि अहवालही सादर करण्यात आला. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर सरकारने काय केले? हेही पाहणे आवश्यक आहे. अन्यथा न्यायालयीन चौकशी केवळ एक औपचारिकता ठरेल,’ अशी भीतीही न्या. ओक यांनी व्यक्त केली.दरम्यान, खंडपीठाने ज्या पोलीस स्टेशनमध्ये २५ सीसीटीव्ही प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत, त्याचे फूटेज तपासण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने गृह विभागाला दिले. (प्रतिनिधी)