शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

संध्याकाळ होताच तुमची मांडीला मांडी कशी लागते?शरद पवारांचा भाजपा-सेनेला सवाल

By admin | Updated: February 12, 2017 23:17 IST

जितेंद्र आव्हाड यांचा सारखा जागृत लोकप्रतिनिधी असेल तर काय घडू शकते हे मुंब्रा आणि कळवा येथील विकासाच्या कामांनी दाखवून दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 12- जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा जागृत लोकप्रतिनिधी असेल तर काय घडू शकते हे मुंब्रा आणि कळवा येथील विकासाच्या कामांनी दाखवून दिले आहे. आपण सर्वांनी त्यांना भरघोस मते देऊन विधान सभेत पाठिविले त्याबद्दल आपले आभार मानतो असे सांगून आता ठाण्याचा विकास हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ठाणे महानगर पालिकेत निवडून पाठवा असे आवाहन शरद पवार यांनी केले. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेकरिता ते कळवा येथे आले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या भरगच्च सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांनी मुंब्रा ङोई कळवा येथील विकासाच्या कामांवर समाधान व्यक्त केले. राज्यात आणि देशात भाजप सेनेची सत्ता आहे. मात्र रोज या दोघांनाच संघर्ष बघायला मिळतो आहे. मुख्यमंत्री म्हणताहेत सेनेची गुंडगिरी खपवून घेणार नाही. तर उद्धव ठाकरे म्हणताहेत भाजप सत्तेचा गैर वापर करतोय. एकमेकांवर असे आरोप करताहेत. मग तुम्ही एकत्र कसे? संध्याकाळ होताच तुमची मांडीला मांडी कशी लागते? असे सवाल उपस्थित करत आता जनतेला फसवू नका. जनता तुम्हाला धडा शिकवेल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार दिला आहे. एकेकाळी खंडेराव रांगणेकर, पी. सावळाराम, अ‍ॅड हेडगे यांच्‍यासारख्‍या दिग्‍गजांनी ठाण्‍याचे नेतृत्‍व केले. मात्र गेल्‍या वीस वर्षांत शिवसेनेच्‍या हातात सत्‍ता दिल्‍यानंतर शिवसेनेने धोरणी,अभ्‍यासू लोकांच्‍या हातात नेतृत्‍व दिले नाहीत. शिवसेनेच्‍या कारभारामुळे या शहराचे पाणी नियोजन फसले, घनकचरा नियोजन फसले. सेनेने ठाणेकरांवर गुन्‍हेगार उमेदवार लादले कारण शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तेव्‍हा जर खरया अर्थाने ठाण्‍याचा चेहरा बदलायचा असेल तर ठाण्‍याचे नेतृत्‍व व राज्‍यकर्ते बदलायला हवे असे आवाहन राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी येथे केले. ठाणे महानगर पालिकेत २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी ठाण्याचा विकास करायचा असेल तर सत्ता परिवर्तन करा. असे वाहन करत सेनेवर टीका केली. शिवसेनेला कतृत्‍ववान माणसांची गरज वाटत नाही. एकेकाळी सुसंस्‍कृत, अभ्‍यासू नेत्‍यांनी ठाण्‍याचे नेतृत्‍व केले. रांगणेकर, सावळाराम, अ‍ॅड हेगडे अशा नेत्‍यांचे ठाणे शिवसेनेने संपवले आणि गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेले उमेदवार देऊन शहराला बकाल केले. शिवसेनेच्‍या २५ वर्षाच्‍या सत्‍तेत एकही सांगण्‍यासारखा मोठा प्रकल्‍प उभा राहिला नाही हे दुर्देव आहे. रोज मित्रपक्ष भाजपाला नावे ठेवायची परंतू सत्‍तेतून बाहेर पडायचे नाही, कारण शिवसेनेला सत्‍तेची उब हवी आहे. सत्तेपेक्षा शहराचा विकास ज्‍यांना हवा आहे अशांना आपण निवडून द्या असे आवाहन पवार यांनी आपल्‍या भाषणात केले. याच शिवसेनेने ठाणेकरांचा मालमत्‍ता कर वाढला आणि आता सत्‍ता दिली तर कर कमी करू असे जाहिरनाम्‍यात सांगत आहे. या ही दुटप्‍पीला काय म्हणायचे? याचाच अर्थ असा की, शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अशांना सत्‍तेत राहण्‍याचा अधिकार नाही. शिवनेनेमुळे ठाण्‍याच्‍या विकासाला आहोटी लागली. एकही सांगण्‍यासारखे काम शिवसेनेला करता आले नाही. पाणी, घनकचरा, मलनिःसारण यांसारख्या सगळयाच कामांचे नियोजन फसले आहे. तेव्‍हा ठाण्‍याचा चेहरा बदलायचा असेल तर नेतृत्‍व व राज्‍यकर्ते बदलायला हवेत असेही यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले. महापालिकेचा कारभार कसा असावा हे नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील कारभार पाहून ठरवावे. या दोन्ही महानगर पालिकेत येथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. त्यामार्फत तेथील विकास करून पक्षाच्या प्रतिनिधींनी एक आदर्श दाखवून दिला. असे सांगून नवी मुंबई महापालिकेने गेल्या १० वर्षांत पाणी. पट्टी आणि इतर कारण वाढ केलेली नाही. विकासाला केंद्रित करून जनतेला सर्व सुविधा दिल्या. मग जुन्या ठाणे महानगर पालिकेला हे का जमत नाही. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हालाही अशी महापालिका हवी असेल तर परिवर्तन करा. सत्ता बदल करा. ठाण्याच्या विकासासाठी तुम्हाला राष्ट्रवादीने उमेदवारांची फौज दिली आहे. त्यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कालवा आणि मुंब्रा येथे अनेक विकास कामे झाली. अनेक कामे होण्याच्या मार्गावर आहेत. ही शहरे विकास करत असताना शिवसेनेने खारीगाव येथे लोकवस्तीमध्ये मलःनिसारनाचे उदंचन केंद्र सुरु करत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथून हलवावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. ज्यांनी खून, बलात्कारांसारखे गुन्ह्याची नोंद असलेल्यांना उमेदवारी दिली त्या पक्षांना धडा शिकवा. असे आवाहन करून गृह खाते असलेल्या मुख्यमंत्री यांनी सेनेची अशी गुंडगिरी का खपवून घ्यायची? असा प्रश्न करून तुमच्या अधिकारांना किंमत नाही का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा कळव्याचा विकास झपाट्याने होतो आहे. येथे उभी राहत असलेल्या चौपाटीचे काम मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे अशा लोक[प्रतिनिधीला तुम्ही भरघोष मतांनी निवडून विधानसभेत पाठविले आहे त्याबद्दल तुमचे आभार मानतो असेही पवार म्हणाले. विकासाचे राज्य हवे असेल, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शेवटी पवार यांनी केले. यावेळी मंचकावर आमदार जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, प्रमोद हिंदुराव, संजीव नाईक, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, मनोहर साळवी, अशोक पराडकर, संजय वढावकर, मंदार किणी आदी नेते आणि कळवा सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी आमदार आव्हाड आणि गणेश नाईक यांचीही भाषणे झाली. ठाणे, दि. १२; जितेंद्र आव्हाड यांचा सारखा जागृत लोकप्रतिनिधी असेल तर काय घडू शकते हे मुंब्रा आणि कळवा येथील विकासाच्या कामांनी दाखवून दिले आहे. आपण सर्वांनी एव्हडं यांना भरघोस मते देऊन विधान सभेत पाठिविले त्याबद्दल आपले आभार मानतो असे सांगून आता ठाण्याचा विकास हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ठाणे महानगर पालिकेत निवडून पाठवा असे आवाहन शरद पवार यांनी केले. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेकरिता ते कळवा येथे आले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या भरगच्च सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांनी मुंब्रा ङोई कळवा येथील विकासाच्या कामांवर समाधान व्यक्त केले. राज्यात आणि देशात भाजप सेनेची सत्ता आहे. मात्र रोज या दोघांनाच संघर्ष बघायला मिळतो आहे. मुख्यमंत्री म्हणताहेत सेनेची गुंडगिरी खपवून घेणार नाही. तर उद्धव ठाकरे म्हणताहेत भाजप सत्तेचा गैर वापर करतोय. एकमेकांवर असे आरोप करताहेत. मग तुम्ही एकत्र कसे? संध्याकाळ होताच तुमची मांडीला मांडी कशी लागते? असे सवाल उपस्थित करत आता जनतेला फसवू नका. जनता तुम्हाला धडा शिकवेल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार दिला आहे. एकेकाळी खंडेराव रांगणेकर, पी. सावळाराम, अ‍ॅड हेडगे यांच्‍यासारख्‍या दिग्‍गजांनी ठाण्‍याचे नेतृत्‍व केले. मात्र गेल्‍या वीस वर्षांत शिवसेनेच्‍या हातात सत्‍ता दिल्‍यानंतर शिवसेनेने धोरणी,अभ्‍यासू लोकांच्‍या हातात नेतृत्‍व दिले नाहीत. शिवसेनेच्‍या कारभारामुळे या शहराचे पाणी नियोजन फसले, घनकचरा नियोजन फसले. सेनेने ठाणेकरांवर गुन्‍हेगार उमेदवार लादले कारण शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तेव्‍हा जर खरया अर्थाने ठाण्‍याचा चेहरा बदलायचा असेल तर ठाण्‍याचे नेतृत्‍व व राज्‍यकर्ते बदलायला हवे असे आवाहन राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी येथे केले. ठाणे महानगर पालिकेत २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी ठाण्याचा विकास करायचा असेल तर सत्ता परिवर्तन करा. असे वाहन करत सेनेवर टीका केली. शिवसेनेला कतृत्‍ववान माणसांची गरज वाटत नाही. एकेकाळी सुसंस्‍कृत, अभ्‍यासू नेत्‍यांनी ठाण्‍याचे नेतृत्‍व केले. रांगणेकर, सावळाराम, अ‍ॅड हेगडे अशा नेत्‍यांचे ठाणे शिवसेनेने संपवले आणि गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेले उमेदवार देऊन शहराला बकाल केले. शिवसेनेच्‍या २५ वर्षाच्‍या सत्‍तेत एकही सांगण्‍यासारखा मोठा प्रकल्‍प उभा राहिला नाही हे दुर्देव आहे. रोज मित्रपक्ष भाजपाला नावे ठेवायची परंतू सत्‍तेतून बाहेर पडायचे नाही, कारण शिवसेनेला सत्‍तेची उब हवी आहे. सत्तेपेक्षा शहराचा विकास ज्‍यांना हवा आहे अशांना आपण निवडून द्या असे आवाहन पवार यांनी आपल्‍या भाषणात केले. याच शिवसेनेने ठाणेकरांचा मालमत्‍ता कर वाढला आणि आता सत्‍ता दिली तर कर कमी करू असे जाहिरनाम्‍यात सांगत आहे. या ही दुटप्‍पीला काय म्हणायचे? याचाच अर्थ असा की, शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अशांना सत्‍तेत राहण्‍याचा अधिकार नाही. शिवनेनेमुळे ठाण्‍याच्‍या विकासाला आहोटी लागली. एकही सांगण्‍यासारखे काम शिवसेनेला करता आले नाही. पाणी, घनकचरा, मलनिःसारण यांसारख्या सगळयाच कामांचे नियोजन फसले आहे. तेव्‍हा ठाण्‍याचा चेहरा बदलायचा असेल तर नेतृत्‍व व राज्‍यकर्ते बदलायला हवेत असेही यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले. महापालिकेचा कारभार कसा असावा हे नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील कारभार पाहून ठरवावे. या दोन्ही महानगर पालिकेत येथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. त्यामार्फत तेथील विकास करून पक्षाच्या प्रतिनिधींनी एक आदर्श दाखवून दिला. असे सांगून नवी मुंबई महापालिकेने गेल्या १० वर्षांत पाणी. पट्टी आणि इतर कारण वाढ केलेली नाही. विकासाला केंद्रित करून जनतेला सर्व सुविधा दिल्या. मग जुन्या ठाणे महानगर पालिकेला हे का जमत नाही. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हालाही अशी महापालिका हवी असेल तर परिवर्तन करा. सत्ता बदल करा. ठाण्याच्या विकासासाठी तुम्हाला राष्ट्रवादीने उमेदवारांची फौज दिली आहे. त्यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कालवा आणि मुंब्रा येथे अनेक विकास कामे झाली. अनेक कामे होण्याच्या मार्गावर आहेत. ही शहरे विकास करत असताना शिवसेनेने खारीगाव येथे लोकवस्तीमध्ये मलःनिसारनाचे उदंचन केंद्र सुरु करत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथून हलवावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. ज्यांनी खून, बलात्कारांसारखे गुन्ह्याची नोंद असलेल्यांना उमेदवारी दिली त्या पक्षांना धडा शिकवा. असे आवाहन करून गृह खाते असलेल्या मुख्यमंत्री यांनी सेनेची अशी गुंडगिरी का खपवून घ्यायची? असा प्रश्न करून तुमच्या अधिकारांना किंमत नाही का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा कळव्याचा विकास झपाट्याने होतो आहे. येथे उभी राहत असलेल्या चौपाटीचे काम मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे अशा लोक[प्रतिनिधीला तुम्ही भरघोष मतांनी निवडून विधानसभेत पाठविले आहे त्याबद्दल तुमचे आभार मानतो असेही पवार म्हणाले. विकासाचे राज्य हवे असेल, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शेवटी पवार यांनी केले. यावेळी मंचकावर आमदार जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, प्रमोद हिंदुराव, संजीव नाईक, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, मनोहर साळवी, अशोक पराडकर, संजय वढावकर, मंदार किणी आदी नेते आणि कळवा सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी आमदार आव्हाड आणि गणेश नाईक यांचीही भाषणे झाली.