शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मी परीक्षा कशी देऊ?सातवीतील मुलाची एसटीसाठी याचिका

By admin | Updated: March 23, 2017 03:15 IST

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील महिन्यापासून एसटी सेवा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) घेतल्याने,

मुंबई: वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील महिन्यापासून एसटी सेवा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) घेतल्याने, एका सातवीतील विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शाळेत जाण्याचे विशेषत: परीक्षेला वेळेत पोहोचता येणार नाही, या भीतीने सातवीच्या विद्यार्थ्याने महामंडळाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.बारा वर्षीय शॅरियन दब्रे हा भुईगावात राहातो. त्याच्या घरापासून शाळेत चालत जाण्यासाठी दीड तास एवढा वेळ लागतो. या भागात एसटीची बस सकाळी साडेसहा वाजता येते. ही बस पकडून शॅरियन व अन्य विद्यार्थी भुईगावापासून सहा कि.मी. दूर असलेल्या सेंट अ‍ॅन्थनी कॉन्व्हेंट शाळेत सकाळी ७: १० वाजता पोहोचतो. एप्रिल महिन्यात एसटीची सेवा रद्द झाल्यास, या विद्यार्थ्यांना एवढ्या सकाळी शाळेत जाण्यासाठी अन्य कोणतीच सुविधा नाही. परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने, आपण परीक्षेवर वेळेवर पोहोचू शकत नाही, या भीतीने शॅरियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एसटीला निर्णय मागे घेण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी शॅरियनने याचिकेद्वारे केली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये एसटीने महापालिकेच्या हद्दीतून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहितीही महापालिकेला दिली, तसेच त्यांना महापालिकेची बससेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, वसई-विरार महापालिकेने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी या भागात एसटीच्या ४८ फेऱ्या होत. मात्र, महापालिकेची स्थापना झाल्यानंतर, या फेऱ्यांची संख्या १४ वर आली आहे. महापालिकेच्या हद्दीतून एसटी सेवा उपलब्ध करायची असल्यास महामंडळाला महापालिकेकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)