शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टुरिस्ट परमिटवर ओला-उबर धावतात कशा?- हायकोर्ट

By admin | Updated: August 25, 2016 05:59 IST

राज्य सरकारच्या एकाही नियमाचे पालन न करता, ओला आणि उबरच्या टॅक्सी रस्त्यांवरून धावतात कशा?

मुंबई : राज्य सरकारच्या एकाही नियमाचे पालन न करता, ओला आणि उबरच्या टॅक्सी रस्त्यांवरून धावतात कशा? कोणत्या धोरणांतर्गत त्यांना टुरिस्ट परवान्यावर टॅक्सी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागितले. ओला, उबरच्या टॅक्सी अन्य टॅक्सीप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. त्या टुरिस्ट टॅक्सी आहेत. टुरिस्टबरोबरच या टॅक्सी स्थानिक प्रवाशांची ने-आण करतात. त्याशिवाय या टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही, तसेच त्यांच्या ठावठिकाण्याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत नाही, असे असोसिएशनने याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. त्यावर सरकारी वकिलांनी परिवहन विभागाने फ्लीट टॅक्सींसाठी योजना आखली असून, अद्याप या योजनेला सरकारकडून परवानगी मिळालेली नाही, असे खंडपीठाला सांगितले.‘या टॅक्सी टॅक्सी स्टँडवर थांबत नाहीत, त्यांना परवानगीच नाही. या दोन्ही कंपन्या सरकारच्या नियमांचे पालन करत नाहीत. या कॅब सेवांवर नियंत्रण ठेवायला काही यंत्रणाच अस्तित्वात नाही. हे केव्हापासून सुरू झाले आहे? तुम्ही केवळ रस्त्यावर गोंधळ निर्माण करण्यासाठी कारची संख्या वाढवलीत,’ अशा शब्दांत खंडपीठाने राज्य सरकारची खरडपट्टीही काढली.अशा टॅक्सींना रस्त्यावरून धावण्याची परवानगी कोणत्या धोरणांतर्गत दिली? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. जर काही योजना आखली असेल, तर या प्रतिज्ञापत्रासह त्या योजनेचीही माहिती द्या, असेही खंडपीठाने म्हटले.याचिकेनुसार, मोटार वाहन अ‍ॅक्ट अंतर्गत, ज्या वाहन मालकांना सरकार कंत्राट परवाना देते, त्याच लोकांना अशा प्रकारची सुविधा देण्याची मुभा आहे, तसेच या टॅक्सी केवळ परिवहन विभागाने ठरवून दिल्याप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारू शकतात. या कॅबना पर्यटनाचा विकास करण्यासाठी टुरिस्ट परवाना दिला आहे. त्यामुळे या कॅबचा वापर टॅक्सी म्हणून केला जाऊ शकत नाही. (प्रतिनिधी) >रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यारओला, उबेरसह अ‍ॅप बेस्ड कंपन्यांवर निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणी करत तीन युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहेत. यामध्ये २९ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक जय भगवान महासंघ या नव्यानेच आलेल्या युनियनकडून देण्यात आली. ३१ आॅगस्ट रोजी मुंबई आॅटोरिक्शा-टॅक्सीमेन्स युनियनने एकदिवसीय संप पुकारला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २९ आॅगस्ट रोजीच्या संपात स्वाभिमान टॅक्सी युनियनही उतरली आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि बेमुदत संप पुकारत असल्याचे सांगितले. स्वाभिमान टॅक्सी युनियननेही याच दिवशी संपाची हाक दिली आहे. खासगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी आणि परिवहन विभागाने लवकरच सिटी टॅक्सी योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी असल्याचे युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी स्पष्ट केले. २९ आॅगस्टनंतर त्वरित ३१ आॅगस्ट रोजी मुंबई आॅटोरिक्शा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनीही संप पुकारला आहे.