शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तचे उदात्तीकरण किती योग्य?

By admin | Updated: February 25, 2016 21:12 IST

शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत परत आला तेव्हा जणू काही तो फार मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे, अशा थाटात त्याचे स्वागत झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत परत आला तेव्हा जणू काही तो फार मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे, अशा थाटात त्याचे स्वागत झाले. एवढे कशाला तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय दत्तने तेथील मातीला नमन करून तिरंग्या झेंड्याला सॅल्युट ठोकल्याचे जे दृश्य टीव्हीवर दिसले तेही खरे तर त्याच्या एका आगामी चित्रपटाचे पद्धतशीर आयोजित केलेले चित्रिकरण होते. म्हणजेच एक गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगून संजय दत्तच्या घरवापसीचे केवळ उदात्तीकरणच नव्हे तर व्यापारीकरणही केले गेले.

असे उदात्तीकरण कितपत योग्य असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिक्षा भोगून पूर्ण झालेला कैदी या नात्याने संजय दत्त व याकूब मेमन या दोघांमध्ये फरक काय? दोघांनाही मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झाली होती. संजय दत्तचा तुरुंगवासाचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यावर त्याची शिक्षा पूर्ण झाली. तसेच गळ््याभोवती फास आवळला जाऊन प्राण गेले तेव्हा याकूब मेमनची शिक्षा पूर्ण झाली होती.

असे असले तरी याकूब प्रेत दफनविधीसाठी कुटुंबियांच्या हवाली करायचे की नाही याचा निर्णय करताना इतर गोष्टींबरोबरच त्याचे उदात्तीकरण होणार नाही, याचा विचार केला गेला. नव्हे त्याच्या कुटुंबियांकडून तशी अलिखित हमी घेऊनच मृतदेह ताब्यात देण्यात आला. तरीही अंत्ययात्रेच्या वेळी माहिमला मोठा जनसमुदाय जमला तेव्हा अनेकांच्या कपाळावर अठ्या चढल्या होत्या.

 

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या वेळी पोलीस व लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्या कसाबच्या नऊ सहकाऱ्यांच्या पार्थिवांचेही गुपचूप दफन केले गेले. कुठे दफन केले हे कळले तर कदाचित देशविघातक शक्तींसाठी ते स्फूर्तिस्थान व तीर्थस्थळ ठरेल, हा त्यामागचा विचार होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारले व त्याच्या मृतदेहाची समुद्रात अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली. यामागचा हेतूहू तोच होता. मग संजय दत्तच्या बाबतीतही ही खबरदारी का घेतली नाही? एक सेलिब्रिटी म्हणून?