शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घर घेणाऱ्यांना फसवणे पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 05:14 IST

बांधकामासाठी अर्ज केल्यापासून इमारत उभी राहून ताबा प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्याची माहिती आता आॅनलाइन उपलब्ध होणार आहे़

मुंबई : बांधकामासाठी अर्ज केल्यापासून इमारत उभी राहून ताबा प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्याची माहिती आता आॅनलाइन उपलब्ध होणार आहे़ नव्या इमारतीमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी त्या इमारतीची संपूर्ण माहिती ग्राहकांना पालिकेच्या संकेतस्थळावरून आगाऊ मिळविता येणार आहे़ त्यामुळे मुंबईकरांना ठगणे आता विकासकांना शक्य होणार नाही़‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत पालिकेने नव्या इमारतींच्या आराखड्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुटसुटीत केली आहे़ त्यामुळे बांधकामांना परवानगी मिळवण्याचा कालावधी एक वर्षावरून दोन महिन्यांवर आला आहे़ मात्र ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असल्याने याचा फायदा विकासकांबरोबरच ग्राहकांनाही होणार आहे़ बांधकामाला सर्व परवानगी मिळण्यापूर्वीच विकासक घर विकण्यास काढतात़ इमारतीला सर्व आवश्यक परवानगी मिळविण्यात आले असल्याचे चित्र ग्राहकांसमोर निर्माण करण्यात येते़ ग्राहकही निश्चिंत होऊन घर खरेदी करतात़ मात्र अनेक वेळा मंजूर आराखड्यापेक्षा जास्त मजले बांधण्यात आलेले असतात़ अशा बेकायदा मजल्यांवरील घर खरेदी केल्यानंतर ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे उशिराच लक्षात येते़ (प्रतिनिधी)>असा होईल विकासकाचा फायदाइमारतीची परवानगी आॅनलाइन मिळणार असल्याने विकासकाचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ विविध विभागांच्या परवानगीसाठी विकासकाला पालिकेच्या एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत़ तसेच आवश्यक शुल्कही एकाच ठिकाणी भरता येणार आहे़ विशेष म्हणजे राज्य व केंद्राची विविध प्राधिकरणेही या तंत्राने जोडण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे त्या परवानगीसाठीही विकासकांना भविष्यात पायपीट करावी लागणार नाही़>व्हिडीओ क्लिपिंगसंकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध होईल़ इमारतीला परवानगी मिळाल्यानंतर तेथे सुरू असलेल्या बांधकामाचा अंदाज येण्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी व्हिडीओ क्लिप पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार आहे़ यातूनच ग्राहकांना बांधकामाचा अंदाज घेणे शक्य होणार आहे़पाहणीनंतरच ताबा प्रमाणपत्र इमारतींना जलद परवानगीसाठी पालिकेने प्रक्रिया सुटसुटीत केली आहे़ विविध परवानग्या निम्म्यावर आणण्यात आल्या आहेत़ ताबा प्रमाणपत्र देण्यापूर्वी इमारतीची पाहणी पालिका करणार आहे़ विकासकाने नियमाचे पालन केले नसल्याचे या पाहणीतून उजेडात आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़