शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांची माहिती देणारे अ‍ॅप

By admin | Updated: March 15, 2017 02:47 IST

रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्या रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत की नाही, हे लवकरच मोबाइलच्या एका क्लिकवर समजणार आहे.

मुंबई : रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्या रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत की नाही, हे लवकरच मोबाइलच्या एका क्लिकवर समजणार आहे. मानखुर्दच्या दामोदर अपंग स्वाभिमान संस्था आणि एका खासगी कंपनीतर्फे रुग्णालयाची माहिती देणारे अ‍ॅप बनवण्यात आले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येणार आहे. येत्या गुढीपाडव्याला हे अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. अनेकदा अपघात अथवा एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला कुठल्या रुग्णालयात न्यावे, असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाइकांना पडतो. यावर तोडगा म्हणून मानखुर्दच्या दामोदर अपंग स्वाभिमान संस्था आणि एका खासगी कंपनीतर्फे हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर क्लिक केल्यास तुमच्या जवळपास असलेल्या रुग्णवाहिका, सरकारी व खाजगी रुग्णालयांचे अंतर त्याचप्रमाणे रुग्णालयात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या बेडची संख्या, रुग्णालयात आकारली जाणारी फी समजणार आहे. रुग्णालयाच्या नावावर क्लिक केल्यानंतर संबंधित रुग्णालयात मेसेज पोहोचण्याचीही सोय आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैद्यकीय सेवा सज्ज करण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सर्व सुविधा आणि डॉक्टरसह उपलब्ध असलेली रुग्णवाहिका बोलावणेदेखील या अ‍ॅपद्वारे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)