शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

चार डॉक्टरांसह इस्पितळ सीईओची चौकशी

By admin | Updated: December 6, 2015 02:47 IST

किडनी तस्करी प्रकरण : नागपूर व औरंगाबादेतील डॉक्टरांचा समावेश!

अकोला : किडनी तस्करी प्रकरणात पोलिसांनी नागपूर येथील हॉस्पिटलचे दोन सोनोग्राफी तज्ज्ञ व औरंगाबाद येथील एका मोठय़ा हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांसह मुख्य कार्यकारी अधिकार्‍यास चौकशीसाठी शनिवारी अकोल्यात आणले. रात्री उशिरापर्यंंंत डॉक्टरांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर या डॉक्टरांना सोडून देण्यात आले व रविवारी ६ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी देवेंद्र श्रीधर सिरसाट व आनंद भगवान जाधव गोरगरीब, गरजू व्यक्तींना हेरून त्यांना व्याजाने पैसा पुरवायचा आणि पैसा देण्यास असर्मथ ठरलेल्या व्यक्तींवर दबाव टाकायचा तसेच पैशांचे आमिष दाखवून त्यांची किडनी काढायची, असा गोरखधंदाच सुरू केला. संतोष गवळी आणि शांताबाई खरात यांची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी किडनी तस्करी प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर डाबकी रोड पोलीस आणि जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून सिरसाट व जाधव यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून नागपूर, औरंगाबाद येथील डॉक्टरांची (पान १ वरुन)तसेच सांगली जिल्हय़ातील इस्लामपूर येथील शिक्षक शिवाजी कोळी याचेदेखील नाव समोर आले. माहितीच्या आधारे पोलिसांची तीन विशेष पथके नागपूरसह औरंगाबाद व सांगली येथे गुरुवारीच रवाना झाली होती. आरोपीने केले आजारी असल्याचे नाटक!किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधवला न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश हरणे यांनी आरोपींना समोर हजर करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करताच, त्यातील आनंद जाधवने उलटी होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला बाहेर नेल्यावर मात्र, त्याने उलटी केली नाही. यानंतर त्याच्या विधिज्ञांनी तो आजारी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला वैद्यकीय उपचारांची गरज पडल्यास, त्याला ते उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला. वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकार्‍यांचा प्रतिसाद नाहीनागपूर व औरंगाबादेतील चार डॉक्टर व एका हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यास ताब्यात घेतल्याबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तपास अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी डॉक्टरांना ताब्यात घेतल्याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. वैद्यकीय समिती नेमण्यासाठी 'एसपीं'चे पत्रकिडनी काढलेल्या पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय समिती नेमावी आणि या समितीच्या देखरेखीत पाचही जणांची तपासणी करण्यात यावी, यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना पत्र पाठविले आहे.