शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना..."; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली...
3
भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल
4
धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
5
Vodafone Idea आता २०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत, बोर्डाची मंजुरी; तोट्याचा सामना करतेय कंपनी
6
"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...
7
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
8
ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम
9
ऑपरेशन सिंदूर ऐन बहरात असताना अचानक युद्धविराम कसा काय झाला? CDS अनिल चौहान यांनी सांगितलं नेमकं कारण  
10
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा!
12
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
13
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
14
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
15
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
16
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
17
कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून
18
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
19
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
20
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ

By admin | Updated: May 7, 2017 06:38 IST

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या मागणीसंदर्भात आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या मागणीसंदर्भात आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी सांगितले. आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घडवून चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात दिले होते. त्याची पूर्तता करीत त्यांनी आशा स्वयंसेवी शिष्टमंडळाची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत भेट घडवून आणली.मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट घेतली. या वेळी डॉ. सावंत यांनी पीसीपीएनडीटी कायदा, गर्भपात कायदा, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा यामध्ये काळानुरूप बदल करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेली गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांबरोबर समन्वय साधणे तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या नियमात बदल करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.१९७१ सालच्या गर्भपात कायद्यांतर्गत गर्भपात केंद्र नूतनीकरणाची सोय तीन किंवा पाच वर्षांची करण्यात यावी; तसेच आदिवासी भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक उमेदवारांची विशेष गुणवत्ता यादी तयार करून अशा उमेदवारांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे किमान त्याच क्षेत्रात सेवा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे.परदेशातून भारतात खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सोयीचे व्हावे म्हणून प्रमाणित मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) करणे आवश्यक असून, त्यामुळे दोन देशांत आणि दोन रुग्णसंस्थांमध्ये विसंवाद होणार नाही अशी विनंतीदेखील डॉ. सावंत यांनी या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली.