शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

घरच्यांना नकोशी झालेली माणसं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:36 IST

अनेक प्रश्न येथील मनोरुग्णालयातील बरे झालेले रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करीत आहेत.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- माझा भाऊ मला कधी घ्यायला येणार... माझ्या नवऱ्याला माझी आठवण येत नाही का... माझ्या आईला मला भेटायचं आहे हो... असे एक ना अनेक प्रश्न येथील मनोरुग्णालयातील बरे झालेले रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करीत आहेत. मात्र, तिच्या भावाने दिलेला मोबाइल कायम स्वीच आॅफ आहे, तर तिच्या नवऱ्यानं बदललेल्या घराचा पत्ता कळवलेला नाही. आईला भेटायला आतुर असलेल्या मुलीला घ्यायला उद्या येतो, असं सांगणाऱ्या वडिलांचा उद्या उजाडतच नाही.ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील साडेतीनशेहून अधिक रुग्ण नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी ६० टक्के रुग्ण बरे झाले असतानाही त्यांचे नातेवाईक त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नसल्याची शोकांतिका आहे. चिंतेची बाब म्हणजे यात महिला रुग्णांची संख्या अधिक आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात १५०० हून अधिक रुग्ण असून यातील ३७१ रुग्ण हे दीर्घ कालावधीपासून दाखल आहेत. त्यापैकी बरे झालेले रुग्ण घरी जायला उत्सुक आहेत. आम्ही इथून कधी परत जाणार, आम्हाला घरी न्यायला कुणी का येत नाही, आम्ही आता बरे झालो असताना आम्हाला इथेच राहण्याची सक्ती का, अशी प्रश्नांची सरबत्ती ते करतात. पण, त्यांचे रक्ताचे नातेवाईक त्यांना पूर्णपणे विसरले आहेत. त्यांची साधी विचारपूस करायला ते वर्षानुवर्षे फिरकले नाहीत, तर यांना कोणाच्या ताब्यात देणार, असा यक्षप्रश्न मनोरुग्णालयासमोर उभा आहे. बरे झालेल्या रुग्णांनी खूप तगादा लावल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी मनोरुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाइकांना फोन केल्यावर मोबाइल आउट आॅफ कव्हरेज एरिया असतो. क्वचित, एखादा फोन उचलला गेला तर आम्ही उद्या किंवा परवा येऊ, पण आज वेळ नाही, असं सांगितलं जातं. पण, तो उद्या उगवत नाही. चुकीचा मोबाइल क्रमांक आणि बदललेला घरचा पत्ता अशा अनेक कारणांमुळे अनेकांचे परतीचे दोर कापले गेले आहेत. एखादीला उंबरठ्यापाशी आलेला मृत्यू सोबत येण्याकरिता खुणावत असतो... मात्र, तिला तिच्या नवऱ्याला शेवटचं भेटण्याची आस लागलेली असल्याने कुडीतला प्राण घुटमळतो... मात्र, तिची ती भेटीची तळमळ अस्वस्थ करणारी आणि विसरता न येणारी असते... >२६५ महिला, १०६ पुरुष पाहताहेत वाटमनोरुग्णालयात दीर्घ काळापासून असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्या अधिक असून त्यामध्ये २६५ महिला, तर पुरुषांची संख्या १०६ आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल असलेल्या महिलांची संख्या १२८, तर पुरुषांची संख्या ३७ आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली.