शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

घरांच्या रंगरंगोटीवर महागाईचे विघ्न !

By admin | Updated: October 16, 2016 18:33 IST

दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा आनंद व उत्साहाचा सण़ घराची रंगरंगोटी, विविध वस्तू व कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली की

ऑनलाइन लोकमत / संतोष वानखडे
वाशिम, दि. 16 - दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा आनंद व उत्साहाचा सण़ घराची रंगरंगोटी, विविध वस्तू व कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली की, दिवाळीची चाहुल लागते. दिवाळीच्या कामांची सुरुवात होते ती घराच्या रंगरंगोटीपासूऩ यंदा मात्र रंगांच्या किंमती, पेंटरच्या मजुरीत प्रचंड वाढ झाल्याने रंगरंगोटीवर महागाईचे विघ्न असल्याचे दिसून येते.
दिवाळीच्या उत्सवात नाविण्यावर अधिक भर असतो़ म्हणूनच नवीन रंग देण्यापासून तर नवनवीन वस्तू खरेदी करण्यापर्यंत अनेक गोष्टींना दिवाळीत प्राधान्य दिले जाते़ घराची साफसफाई हे काम सर्वात आधी केल्यानंतर घराच्या भिंती रंगविण्याला सुरूवात होते़ पूर्वी चुन्यात पाहिजे तो रंग मिसळून घराच्या भिंती रंगविल्या जायच्या़ १००-२०० रुपयात संपूर्ण घर रंगविले जात असे़ परंतु आता रंगांचे शेकडो प्रकार बाजारात उपलब्ध आहेत़ यावर्षी रंगांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. साधारणत: दोन वर्षांपूर्वी ४० ते १३० रुपये किलो दराने विकले जाणारे ‘डिस्टेंपर’ आता ६० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहे.  विविध रंगातील माती आता ५० ते ८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे़ ४०० ते एक हजार रुपयांच्या दरम्यान असलेले ‘रॉयल प्लॅस्टिक’ रंगांचे दर आता ६०० ते १३०० असे झाले आहेत. पूर्वी १५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान असलेले ‘एसपेंट’ आता २०० ते ४५० रुपयांच्या दरम्यान आहे. पूर्वी २५० ते २३० रुपयांदरम्यान असलेले ‘आॅईलपेंट’ आता प्रति लिटर ३५० ते ४५० रुपयांवर गेले आहे. ‘प्लास्टीक पेंट’ ३५० ते ५०० रुपये प्रति लिटर, ‘लक्झरीयस पेंट’ ७५० ते ९०० रुपये असे दर आहेत. 
रंगाव्यतिरिक्त एका घराला ब्रश, स्टेनर, थिनर व टारपेन या साहित्यासाठी साधारणत: ७०० ते १५०० रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे. पेंटरच्या मजुरीचा खर्चही घरमालकाला पेलावा लागतो. विविध प्रकारची पेंटींग ३०० ते ८०० रुपये प्रती ब्रास आहे.