शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने खडसावले

By admin | Updated: April 8, 2017 05:18 IST

पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राबाबत उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना धारेवर धरले.

मुंबई : पोलीस संरक्षणाचे शुल्क न देणाऱ्या मंत्र्यांनाही पोलीस संरक्षण द्यायचे की नाही, या संदर्भात पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राबाबत उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना धारेवर धरले. आपल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या प्रधान सचिवांनाही शुक्रवारी तातडीने बोलावले होते.संरक्षण शुल्क थकीत असलेल्या मंत्र्यांना पोलीस संरक्षण द्यायचे की नाही, याबाबत गृहविभागाच्या सहसचिवांनी पोलीस महासंचालकांचे मत मागविले. या संदर्भातील पत्र शुक्रवारी उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आले. हे पत्र पाहिल्यावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत सहसचिवांना धारेवर धरले.कॅबिनेट मंत्री किंवा जे सरकारमध्ये आहेत, त्यांच्या संरक्षणाविषयी आम्ही कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. आम्ही केवळ खासगी व्यक्तींविषयी बोलत होतो. या सहसचिवांनी आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून मंत्र्यांना संरक्षण द्यायचे की नाही, या संदर्भात महासंचालकांकडे मत मागवले. एक तर अधिकाऱ्याला या आदेशाबाबत माहिती नसावी किंवा त्यांनी जाणूनबुजून केले असावे. दोन्ही बाबतीत त्यांना खडसावणे गरजेचे आहे. गृहविभागाच्या प्रधान सचिवांना त्यांचे कनिष्ठ काय करत आहेत, याची जाणीव आहे का? मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती द्यावी,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने चेंबरमध्ये बोलावून घेतले. सुनावणीदरम्यान मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सुरक्षेबाबत पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि महसूल विभागाकडून सूचना घेण्यात येत असून, या संदर्भात धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली.सरकारला शुल्कवसुली करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (प्रतिनिधी)>चुकीचा अर्थ लावलाआपल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या प्रधान सचिवांनाही शुक्रवारी तातडीने बोलावले होते.