शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांनी केले शहिद परिवारांचे सांत्वन

By admin | Updated: May 13, 2014 23:38 IST

चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी, पावीमुरांडा भागात रविवारी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात पोलीस दलाचे वाहन उडविले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी, पावीमुरांडा भागात रविवारी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात पोलीस दलाचे वाहन उडविले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी गडचिरोली येथे येऊन भूसुरूंग स्फोट झाला त्या घटनास्थळाला भेट दिली.

यावेळी त्यांनी या ठिकाणची सर्व परिस्थिती पोलीस दलातील अधिकारी व जवान यांच्याकडून जाणून घेतली. घटनेच्या दोन दिवस आधी या परिसरातील जंगलात सी-६0 पथकाचे कमाडंट इंदरशहा सडमेक यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अभियान राबवित होते. त्या कमाडंटने आज घटनास्थळावर पालकमंत्र्यांना घटनेची सर्व हकीगत कथन केली. ज्या ठिकाणाहून नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाचा घोडा दाबला त्या जागेवरही गृहमंत्री गेलेत. संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री चामोर्शी येथे दाखल झाले. येथे त्यांनी शहीद पोलीस जवान रोशन डंबारे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील शहीद जवान दुर्योधन नाकतोडे यांच्या परिवाराचीही पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर गडचिरोली येथे पोलीस मुख्यालयात सी-६0 पोलीस पथकातील जवानांचा दरबार गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पोलीस जवानांच्या अडचणी त्यांना अभियानादरम्यान येत असलेल्या समस्या आदी गृहमंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी अनेक जवानांशी त्यांनी चर्चा केली. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्‍वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. एक तास हा दरबार चालला. त्यानंतर जिल्ह्यात प्रमुख विभागाच्या अधिकार्‍यांची पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक सुवेज हक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)