शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरांसाठी विधान भवनावर धडक

By admin | Updated: July 14, 2017 02:34 IST

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे निमित्त साधत १ आॅगस्ट रोजी गिरगाव चौपाटी ते विधान भवन असा धडक मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघासोबत रयतराज कामगार संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच अशा विविध संघटनांनी एकत्र येत गिरणी कामगार कृती संघटना स्थापन केली आहे. या कृती संघटनेच्या वतीने हा महामोर्चा काढला जाणार आहे. महामोर्चात माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह गोविंदराव मोहिते, दत्ता इस्वलकर, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे असे विविध संघटनांचे कामगार नेते सामील होणार आहेत.गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने केल्यानंतर पहिल्या टप्प्यातच ६ हजार ९३३ घरांचे वाटप केले. मात्र भाजपा सरकारने सत्तेवर आल्यानंतर दोनवेळा सोडत काढूनही केवळ ५ हजार ५१० घरांचे वाटप केले आहे. सध्या गिरणी कामगारांची ७ हजार ७०० घरे तयार आहेत. मात्र त्याचे वाटप अकारण लांबवले जात असल्याचा गंभीर आरोप महामोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अहिर यांनी केला आहे. ते म्हणाले की, २ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी उरलेल्या घरांची सोडत लवकरच काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते हवेतच विरले. आता म्हाडाने आॅनलाइन फॉर्म भरण्याचे जाहीर केले असून, सुमारे २० हजारांहून अधिक कामगारांनी फॉर्म भरले आहेत. मात्र आधी फॉर्म भरलेल्या १ लाख ४० हजार कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. परिणामी, आधीचे कामगार आणि त्यात आता नव्याने भर पडणाऱ्या कामगारांना घरे देण्यासाठी कोणतीच योजना सरकार आखत नसल्याचे अहिर यांचे म्हणणे आहे.>१६ जुलैपासून प्रचारसभाराज्यातील कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी येत्या १६ जुलैला कामगारांच्या प्रचारसभा घेणार असल्याचे कृती संघटनेने सांगितले. या सभांमधून १ आॅगस्टला गिरणी कामगारांचा विक्रमी महामोर्चा काढण्याची तयारी केली जाईल. कृती संघटनेतील सर्व संघटनांचे नेते प्रचार सभांमध्ये भाषणे करतील, अशी माहिती गोविंदराव मोहिते यांनी दिली.