शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

होलोग्रामचे कंत्राट रद्द नव्हे, दुरुस्तीसाठी थांबवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 05:23 IST

होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

जळगाव : बनावट मद्यविक्री रोखण्यास राज्य शासनातर्फे बाटलीवर होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे दिली.ते म्हणाले, बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री असताना बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. परवानाधारक मद्यप्राशन करणाऱ्या इसमाला होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होते. यातून मद्याचा काळाबाजार थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक पाच हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे. होलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. त्याबदल्यात येणारा खर्च हा संबंधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. या प्रक्रियेत शासनाला एक रुपया द्यायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बनावट मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह आपण सुरुवातीपासून आग्रही आहोत. त्यासंदर्भात दोन वेळा मंत्रालयात सादरीकरण करण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. हे कंत्राट देशस्तरावर आहे. आता जागतिक स्तरावर निविदा प्रसिद्ध करण्याबाबत, कंत्राटातील काही त्रुटी दूर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मीडिया ट्रायल संपलेली नाहीबनावट मद्य रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाच्या संदर्भात ही वस्तुस्थिती असताना हजार कोटींचे कंत्राट रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आपल्याबाबत सुरू असलेली मीडिया ट्रायल अजून संपलेली नाही. मद्याच्या बाटलीवर होलोग्राम बसल्यामुळे बनावट दारूचा काळाबाजार बंद होऊन अनेकांना फटका बसणार आहे. मात्र मीडियातून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)