शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

हिंगोलीत दुकानांसह वाहनांवर दगडफेक!

By admin | Updated: January 14, 2015 04:09 IST

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास जमावाने शहरातील गांधी चौक

हिंगोली : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास जमावाने शहरातील गांधी चौक परिसरात धुडगूस घालत दुकाने व वाहनांवर दगडफेक करून अनेकांना मारहाण केली़ या प्रकरणी तिघांंना अटक करण्यात आली़ तर आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकणाऱ्या डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंगवरील गैरप्रकाराचा निषेध करीत काहीजण उपविभागीय पोलिस अधिकारी लांजेवार यांच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यास गेले. डॉक्टर असोसिएशनच्या ग्रुपमध्ये एका डॉक्टरने हे आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकल्याचे त्यांचे म्हणने होते. मात्र, तक्रार दिली नव्हती. नंतर याबाबत अफवा पसरली. त्याचवेळी काही मुलांचे टोळके व्यापाऱ्यांना दुकाने करण्यास भाग पाडू लागला. गांधी चौकात हा जमाव पोहोचल्यानंतर गोंधळ सुरू झाला. मंगळवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने गर्दी होती़ त्याचवेळी काही लोकांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावल्याने आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. अनेक दुकाने, वाहनांवर दगडफेक झाली. पोलिस दाखल झाल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. लोकप्रतिनिधी व पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत व्यापाऱ्यांना दुकाने उघडायला लावली. दुपारनंतर बाजारपेठ पूर्ववत झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात येऊन २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उर्वरित संशयितांच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)