शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा

By admin | Updated: December 1, 2014 11:02 IST

किशोरवयीन/ पौंगडावस्थेतील मुलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. १५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के मुलांमध्ये या विषाणूंचा प्रार्दुभाव होताना दिसत आहे,

पूजा दामले, मुंबईमुंबई : एचआयव्ही एड्सची बाधा होण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्यभरात जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरीही प्रत्यक्षात किशोरवयीन/ पौंगडावस्थेतील मुलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. १५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के मुलांमध्ये या विषाणूंचा प्रार्दुभाव होताना दिसत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.एड्स हा पूर्णत: कधीच बरा होऊ न शकणारा आजार आहे. तसेच हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. लहान वयातच हा आजार जडला, तर त्यांच्या भविष्यावर याचा विपरित परिणाम होणार हे निश्चितच. एचआयव्ही बाधित असणाऱ्या रुग्णांपैकी ८८.७ टक्के रुग्ण हे आधी १५ ते ४९ या वयोगटातील होती. मात्र, आता हे वय कमी होत आहे. एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमुख कारण असुरक्षित शरीर संबंध हेच आहे, म्हणूनच याविषयी तरुणाईमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, स्वेच्छा रक्तदान मोहिमेमुळे रक्ताद्वारे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचेही दिसून आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेद्वारे १९८८ सालापासून १ डिसेंबर ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो. एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २०१० ते २०१५ या पाच वर्षांची संकल्पना ‘शून्य गाठायचे आहे’ अशी आहे. शून्य नवीन एचआयव्ही संसर्ग, शून्य भेदभाव आणि एड्समुळे होणारे शून मृत्यू हे ३ शून्य गाठायचे आहेत. एच.आय.व्ही. ची बाधा होण्याची कारणेअसुरक्षित शरीर संबंधबाधित सिरिंज, सुईबाधित रक्तमातेकडून बाळाला ------------एचआयव्ही बाधित रुग्णाला देण्यात येणारा प्रथम स्तरावरील एआरटी उपचार असफल ठरतो. त्यावेळी त्याला द्वितीय स्तरावरील (सेकंड लाईन एआरटी) उपचार पद्धतीचा वापर केला जातो. हे उपचार घेण्यासाठी रुग्णांना दरमहा जे.जे. रुग्णालयात यावे लागते. ए.आर.टी. सेंटरअ‍ॅटीरिट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच ए.आर.टी. ही थेरपी ज्या ठिकाणी दिली जाते त्याला ए.आर.टी. सेंटर असे म्हटले जाते. व्यक्तीचा रक्ततपासणी अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ त्या व्यक्तीला एड्सची बाधा झाली आहे, असे निदान करता येत नाही. त्या व्यक्तीच्या पुन्हा सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. या तपासण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीला एच.आय.व्ही एड्स असल्याचे निदान केले जाते. या व्यक्तीचा सीडी ४ काऊंट हा ३५० च्या खाली असल्यास त्या व्यक्तीला ए.आर.टी सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. या सेंटरमध्ये त्या व्यक्तीला औषधे दिली जातात. यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक तीन महिन्यांनी या सेंटरमध्ये तपासणी आणि औषधे घेण्यासाठी यावे लागते. एआरटी केंद्रात दिली जाणारी औषधे काळजी आणि आधार केंद्रांमध्ये कोणत्या सेवा प्रदान केल्या जातात?> समुपदेशन> विविध गटांसह नियंत्रकालिक संमेलने> बाह्यभेटी कार्यकर्ता> समर्थन > इतर उपक्रमएआरटीचे उपचार घेण्यातील सातत्य वाढविणे, प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करणे या उद्देशाने आणि मुख्य एआरटी केंद्राचा भार कमी करणे यासाठी नवी दिल्लीच्या नॅकोच्या अधिपत्याखाली महाराज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यात ३१ जिल्ह्यांत एकूण १४० लिंक एआरटी केंद्रे स्थापन केलेली आहेत.