शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 02:36 IST

अपहरण म्हणजे खंडणीसाठी छळ. मात्र नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणात एका वेगळ्याच नात्याची गुंफण समोर आली आहे. सात महिन्यांपूर्वी घरासमोर भावडांसमवेत

नाशिक : अपहरण म्हणजे खंडणीसाठी छळ. मात्र नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणात एका वेगळ्याच नात्याची गुंफण समोर आली आहे. सात महिन्यांपूर्वी घरासमोर भावडांसमवेत खेळताना नंदिनी गायब झाली होती. नंदिनीच्या अपहरणानंतर तिचे कुटुंबीय हवालदिल झाले होते. सहा महिन्यांनी चिमुकल्या नंदिनीचा शोध लागला. मूल होत नसल्याने एका मातेने नंदिनीला मुलगी म्हणून सांभाळण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले होते. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा उलगडा केला. १५ मे २०१५ रोजी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी नंदिनीचे अपहरण केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तिचे वडील महेंद्र शर्मा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेड तपासल्यानंतर त्यात पांढऱ्या रंगाची गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. घटनेच्या आदल्या दिवशीचे (१४ मे) फूटेज तपासल्यानंतर संबंधित गाडी अंबड परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार चौकशी केली असता गाडीचे मॉडेल सांगून गाडीत गणपतीची मूर्ती असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण राज्यात गाडीचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’नावाने पोलीस पथक तयार केले. अखेर दोन महिन्यांपूर्वी नाशिकमधीलच एका मॉलमध्ये ही गाडी अनेकांनी पाहिली. गंगापूर गाव व चार दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत नंदिनी फिरताना बघितल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला आणि तिचा शोध लावला. (प्रतिनिधी)