शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

अपहरणाचा डाव फसला

By admin | Updated: September 12, 2014 00:46 IST

नागपूर येथील युग चांडक या चिमुकल्याचे अपहरण व खूनप्रकरण ताजे असतानाच उमरेड येथील एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास

उमरेड येथील घटना : आरोपीने केली होती १० लाखांची मागणीउमरेड : नागपूर येथील युग चांडक या चिमुकल्याचे अपहरण व खूनप्रकरण ताजे असतानाच उमरेड येथील एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरार नाट्याचा डाव एका तरुणाच्या हिमतीमुळे व अपहरण झालेल्या मुलाने वेळीच प्रसंगावधान बाळगल्याने फसला. दुसरीकडे, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत काही तासातच आरोपीला अटक केली. जयेश संजय सहजरामानी असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, भास्कर सतीश हेडावू (२०, रा. जोगीठाणा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला स्थानिक बौद्धविहाराजवळ उमरेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. जयेश सहजरामानी याच्या वडिलाचे इतवारी मुख्य मार्गावर जयदुर्गा सायकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल्स नामक दुकान आहे. जयेश वेकोलि येथील मॉडर्न स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकतो. ‘नागपूर का गुंडा हुं’जयेश हा नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवन विकास चौकात स्कूलबसची प्रतीक्षा करीत होता. स्कूलबस येण्याआधीच आरोपी भास्करने डाव साधत चाकूचा धाक दाखवत जयेशला पकडले. लगेच जयेशचे वडील संजय सहजरामानी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘तुझा मुलगा किडनॅप झाला आहे, त्याच्याशी बोल’ असे म्हटले. अशातच जयेशने रडत रडतच ‘पप्पा मुझे बचाव’ म्हणताच जयेशचे वडील भांबावले. क्षणातच जयेशच्या हातातील मोबाईल आरोपीने हिसकला. ‘मैं नागपूरका गुंडा हुं. तुने मुझे पहचाना नही. दस लाख रुपये होना. नही तो तेरे बच्चे को खतम कर दुंगा. पुलीस को फोन मत करना’ अशा शब्दात धमकावले. तरुण धावला मदतीला हा प्रकार लक्षात येताच मोहसीन खान याने कोणताही विचार न करता भास्करला पकडले व त्याच्या कानशीलात हाणली. त्यातच जयेशला त्याचे आजोबा कुंदनदास हे घराकडे जात असताना दिसले. जयेशने ‘दादू’ अशी जोरात हाक मारताच आरोपी भास्कर घटनास्थळाहून पळाला. (प्रतिनिधी)पुन्हा फोन वाजला जयेश आजोबासोबत घरी पोहचताच कुटुंबीयांनी जयेशचे वडील संजय यांना फोन केला. मोबाईलवरच जयेशने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. मुलगा सुखरूप असल्याचे ध्यानात येताच. संजय लगेच घरी पोहचले. काही वेळातच आरोपी भास्करचा पुन्हा फोन आला. ‘तेरे लडके को मैने छोड दिया. अब मुझे पाच लाख रुपये की जरूरत है. नगर परिषद के पासवाले किल्ले पर रख देना’ असे म्हणत पोलिसांना सांगू नको, अशी बतावणीही त्याने केल्याचे संजय यांनी सांगितले. संजय यांनी सतर्कता बाळगत पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदविली. पोलिसांची सतर्कतापोलीस निरीक्षक संजय पवार यांनी लगेच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. जयेशकडून व जीवन विकास चौकात काही नागरिकांकडून माहिती घेत पोलिसांनी काही तासातच भास्करला हुडकून काढत अटक केली. यात पोलीस शिपाई प्रदीप चौरे यांनी विशेष कामगिरी बजावली. सहायक पोलीस निरीक्षक एन. के. कराडे, शांताराम मुदमाळी, रोहन डाखोळे यांनीही सहकार्य केले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी भादंवि ३६४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.