शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेचे अपहरण व सुटका

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात तरुणांनी अपहरण केले आहे. शेतामध्ये काम करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद तिच्या सासू सुभद्रा महादेव मास्कर (६०) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली होती.अपहरण झालेली महिला उमेदवार बुधवारी सायंकाळी घरी परतली असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. अपहरणकर्त्यांनी तिला सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या गावापासून ४ ते ५ कि.मी. अंतरावरील आबलोली नाका येथे सोडले. तेथून ती आपल्या घरी गेली. ती पोलीस स्थानकात आल्यानंतर पुढील माहिती घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी गाव पॅनेलकडून तीन पुरुष सदस्य व एक महिला सदस्याचा समावेश आहे. शिवसेनेकडून तीनही महिला सदस्या निवडून आल्या आहेत. सरपंचपदासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण असल्याने निवडून आलेली कोणीही महिला सरपंच होऊ शकते. अशा स्थितीत गाव पॅनेलकडे चार सदस्य असल्याने गाव पॅनेलचाच सरपंच होणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढीतून हे अपहरण झाले असावे, असे बोलले जात आहे.सुभद्रा भास्कर यांच्यासमवेत शेतात काम करीत असताना २२ ते २५ वयोगटातील चार अनोळखी तरुणांनी येऊन ‘विजय मसुरकर यांनी बोलावले आहे,’ असे सांगून या महिलेला वाहनाने घेऊन गेले. उशिरापर्यंत सून घरी परत न आल्याने रात्री अकरा वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)