शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

By admin | Updated: October 18, 2016 05:12 IST

ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे.

मुंबई: ध्वनीप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी राज्य सरकारला ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतले. राज्य सरकार अंसेवदनशील आणि असहाय्य असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली. वारंवार दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना उपस्थित राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिला होता. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत बक्षी उपस्थित होते. न्यायालयाचा आदेश असतानाही ध्वनीमापक यंत्रे घेण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला केला. त्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी कंपनीच्या अंगावर जबाबदारी ढकलली. कंपनीच वेळेत यंत्रे तयार करून देत नसल्याने यापूर्वी दिलेली आॅर्डरही रद्द करण्यात आल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिली.‘मुदतवाढी संपल्यानंतर सरकारने यंत्रे खरेदीची आॅर्डर दिली. याचाच अर्थ सरकार जाणुनबुजून न्यायालयाचे आदेश पाळत नाही. सरकारची ही वृत्ती अयोग्य आहे. सरकारला वेळ मिळावा म्हणून आम्ही मुदतवाढ देत आहोत. मात्र तुम्ही आमचा मौल्यवान वेळ घालवत आहात सरकार असंवेदनशील, असहाय्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २० आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)