शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास हायकोर्टाची मंजूरी

By admin | Updated: October 16, 2015 18:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिल्याने आता दस-याला २२ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकार व शिवसेनेचा अर्ज मान्य करत मेळाव्यास सशर्त परवानगी दिली आहे.
या मेळाव्यात ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करावे लागेल, त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचे निर्देश सरकारला दिले जातील, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक आणि शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, हे औचित्य साधून शिवसेना यंदाच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
 
खेळाचे मैदान असलेले शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ‘वीकॉम ट्रस्ट’ने केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिलेला होता. त्यामुळे तेथे खेळाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असून त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी अर्ज केला जातो.  गेल्या वर्षी न्यायालयाने शिवसेनेला परवानगी नाकारली होती. यंदा मात्र शिवसेनेऐवजी सरकारनेच न्यायालयात धाव घेत शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची मागणी केली. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सेनेच्या मेळाव्यास परवानगी दिली आहे.