शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

उच्चांकी ४०.९ :नाशिककरांना उन्हाचा तडाखा

By admin | Updated: April 13, 2017 22:04 IST

मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.

नाशिक : शहरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम असून, उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. गुरुवारी (दि.१३) शहरात हंगामातील उच्चांकी ४०.९ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली. मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीन दिवस सुमारे ४०.३ अंशांवर शहराचे तपमान होते. त्यानंतर प्रथमच बुधवारी ४०.७ अंशांवर पारा सरकला आणि गुरुवारी दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या आसपास पोहचला आहे. एकूणच दररोज वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिक उष्ण बनले आहे.वाढत्या उन्हाची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहिल्यास पुन्हा उष्णतेची लाट आल्याची घोषणा सरकारी पातळीवरून होण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रथमच ४०.९ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १९ एप्रिल रोजी ४१ हा उच्चांक नोंदविला गेला होता. अद्याप चालू महिन्याचे तीन आठवडे शिल्लक असल्याने गेल्या वर्षाच्या कमाल तपमानाचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गेल्या वर्षीचा विक्रम मोडणारमागील वर्षी १९ एप्रिलरोजी ४१ अंश आणि मे महिन्यामध्येही ४१ अंश इतका उच्चांक राहिला आहे. यावर्षी मात्र एप्रिलच्या १२व्या दिवशीच तपमानाचा पारा थेट ४०.७ अंशाला पोहोचल्याने यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांसाठी प्रचंड तापदायक ठरणारा आहे. यामुळे नागरिकांनी लहान मुले, वृध्दांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बुधवारी तपमानाचा पारा ४०.७अंशावर स्थिरावला; मात्र यापेक्षा पारा कमी न झाल्यास किंवा मार्च महिन्याप्रमाणे पारा सलग चाळीशीच्या पुढे राहिल्यास उष्णतेचा कहर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीरात पाण्याची मात्रा टिकवून ठेवणारी फळे खाण्यावर भर द्यावा. बर्फ व बर्फाचा वापर केले जाणारे शितपेय टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

 

वृक्षतोडीमुळे तपमानाचा पारा चढतागेल्या वर्षापासून आतापर्यंत शहराबाहेरील रिंगरोड विकसीत करण्यासाठी बहुतांश वृक्षांवर कु ऱ्हाड चालविली गेली. मार्च महिन्यातच संपुर्ण गंगापूररोड व शहरातील अन्य भागांमधील वर्षानुवर्षे जुने डेरेदार वृक्ष महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले. एकूण तोडले गेलेले वृक्ष आणि जगविलेले वृक्ष यांच्या आकडेवारीमध्ये कमालीची तफावत असल्याने जमीनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन तपमान मार्चमध्येच चाळीशीपार सरकले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैश्विक तपमानवाढीचा धोका टाळण्यासाठी वृक्षसंवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

 

तपमानाच्या उच्चांकाचा आढावावर्ष -           कमाल तपमान२००८ =     २४ एप्रिल -४१.४२००९ =      १९ एप्रिल- ४१.४ २०१० =       १६ एप्रिल -४२.०२०११ =        २७ एप्रिल - ४०.४२०१२ =        ८ एप्रिल - ४०.० २०१३ =         १ मे - ४०.६ २०१४ =         ७ मे -४०२०१५ =         २० एप्रिल ४०.६२००१६ = १९ एप्रिल /१८ मे - ४१.०