शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची छुपी दरवाढ

By admin | Updated: July 1, 2015 01:25 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) १ जूनपासून एकूण सरासरी २.४४ टक्क्यांनी कमी केले

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) १ जूनपासून एकूण सरासरी २.४४ टक्क्यांनी कमी केले असले तरी ही दरकपात फसवी असून बहुसंख्य ग्राहकांच्या हाती येणारे ताजे बिल पूर्वीपेक्षा कमी नव्हे तर जास्त येण्याचे संकेत आहेत.महावितरणने फेब्रुवारी २०१५ च्या तुलनेत वीजदरात ७.९५ टक्के वाढ करण्याची मागणी केली होती. त्याऐवजी आयोगाने ५.७५टक्क्यांची दरकापत मंजूर केली. मात्र एप्रिल २०१५ च्या तुलनेत ही दरकपात २.४४ टक्के असेल, असे आयोगातर्फे सांगण्यात आले होते. त्यावरून महावितरणच्या ग्राहकांना मामुली का होईना पण दिलासा मिळाला, असा समज निर्माण झाला होता. मात्र आयोगाने दिलेल्या आदेशाचा बारकाईने अभ्यास केला असता वीजदर कमी झाले असले तरी सर्वसामान्य ग्राहकांचे वीजबिल कमी होणार नाही. वस्तुत: ग्राहकास येणारे नवे बिल आधीपेक्षा जास्त असेल.असे होण्याचे कारण काय? तर आयोगाने ज्या एप्रिलमधील दरांशी तुलना केली आहे ते निव्वळ वीजदर नाहीत. तर त्यात इंधन अधिभाराचाही (फ्युएल अ‍ॅडजेस्टमेंट चार्जेस -एफएसी)अंतर्भाव आहे. तसेच आता आयोगाने जे दर ठरवून दिले आहेत ते निव्वळ वीजदर आहेत व त्यात ‘एफएसी’ नाही. एवढेच नव्हे तर आता ठरविलेल्या दरांखेरीज महावितरण ‘एफसीए’ची स्वतंत्र आकारणी करू शकते, असे आयोगानेच त्यांच्या आदेशात म्हटले आहे.महावितरणच्या एप्रिलच्या वीजदरात १५ ते २० टक्के हिस्सा ‘एफएसी’चा होता. त्यामुळे आता ठरवून दिलेले नवे दर या तुलनेत कमी दिसत असले तरी त्यावर किमान १५ ते २० टक्के ‘एफसीए’ लाूग होईल. यातून मूळ दरात झालेली कपात वजा केली तरी प्रत्यक्षात ग्राहकाचे वीजबिल वाढलेले असेल. आयोगाने आता ग्राहकांच्या विविध वर्गांंसाठी ठरवून दिलेले नवे दर पाहिले तर उद्योग, रेल्वे व सार्वजनिक सेवावर्ग वगळता अन्य वर्गांतील सामान्य ग्राहकांचे बिल किमान १० ते कमाल २५ टक्क्यांनीही वाढू शकेल, असे दिसते. (विशेष प्रतिनिधी)नवा धक्काही बसू शकतोयेत्या काही महिन्यांत ग्राहकांना आणखीही धक्का बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचे कारण असे की, इंधन अधिभार वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरानुसार वेळोवेळी ठरविला जातो. आता नवे वीजदर ठरले असले तरी महावितरण इंधन अधिभार वाढवून घेण्यासाठी स्वतंत्रपणे आयोगाकडे मागणी करू शकते. अर्थात इंधन अधिभाीर वाढवून दिला तर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा की पश्चातलक्षी प्रभावाने हे आयोग ठरवितो. त्यानुसार नवा संभाव्य धक्का किती व केव्हापासून बसेल हे लवकरच स्पष्ट होईल.महावितरणच्या एप्रिलच्या वीजदरात १५ ते २० टक्के हिस्सा ‘एफएसी’चा होता. त्यामुळे आता ठरवून दिलेले नवे दर या तुलनेत कमीदिसत आहे.तरी त्यावर किमान १५ ते २० टक्के ‘एफसीए’ लाूग होईल. यातून मूळ दरात झालेली कपात वजा केली तरी प्रत्यक्षात ग्राहकाचे वीजबिल वाढलेले असेल.