शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अहो, बंडू जिवंत आहे!

By admin | Updated: May 14, 2014 05:10 IST

त्याचे नाव बंडू.. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो.

विठ्ठल कांबळे , घाटंजी (यवतमाळ) - त्याचे नाव बंडू.. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते..आणि दुसर्‍यादिवशी निरोप येतो,‘ बंडू जिवंत आहे..!’ तो जिवंतपणीच देव झाला.. बंडूला गावी आणण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्याला जिवंत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जिवंतपणी मृत्यू अनुभवण्याचा प्रसंग यवतमाळ जिल्ह्णातील करमना येथील बंडू मांडवकर या तरुणावर आला. घाटंजी तालुक्यातील करमना येथे गुलाब मांडवकर आपल्या परिवारासह राहतात. त्यांना चार मुलं. तिसर्‍या क्रमांकाचा बंडू नावाचा मुलगा. त्याला दोन अपत्य आहे. तो आठ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्णातील राजुराजवळील रामपूर येथे वास्तव्यास होता. आजूबाजूच्या गावात जावून लोकांचे भविष्य पाहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. ५ मे रोजी त्याच्या मुलीचे गावात लग्न झाले. अन् ६ मे रोजी सकाळी करमना येथे त्याच्या घरी बंडूचे अपघातात निधन झाल्याचा दूरध्वनी आला. तेव्हा त्याचे वडील, भाऊ, पत्नी व नातेवाईक राजुरा येथे पोहोचले. मृतदेह दाखविण्यात आला. चेहरा ओळखू येत नव्हता पण चेहर्‍याची ठेवण व शरीरयष्टी यावरून हा आपलाच बंडू आहे, अशी ओळख पटविली. शवविच्छेदनानंतर प्रेत ताब्यात घेतले. अंत्यसंस्कार करण्यात आले. रितीरिवाजाप्रमाणे तिसर्‍या दिवसाची विधी केला आणि चौथ्या दिवशी देवकारण केले. बंडूच्या नावे चांदीचा देव करण्यात आला. तो देव्हार्‍यात ठेवण्यात आला. गरिबीतही २५ हजार रुपये या सर्व विधीवर खर्च करण्यात आले.