शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यामध्ये आजपासून नागपंचमीसाठी बेमुदत बंद

By admin | Updated: July 2, 2015 00:22 IST

ग्रामस्थ आक्रमक : उत्सवास परवानगीची मागणी

शिराळा : शिराळा येथील नागपंचमीसाठी जिवंत नागाच्या पूजेस आणि मिरवणुकीसाठी राज्य शासनाने संसदेतून खास बाब म्हणून परवानगी आणावी, यासाठी राजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शिराळा ग्रामपंचायतीने या उपोषणास पाठिंबा देऊन, गुरुवार, दि. २ जुलैपासून बेमुदत बंदचे आवाहन केले आहे. दि. २९ जूनपासून माने तहसील कार्यालयासमोर नागपंचमीबाबत बेमुदत उपोषणास बसले आहेत. दि. ३० जून रोजी सायंकाळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन माने यांच्या उपोषणास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता सर्व ग्रामस्थ, व्यापारी, नाग मंडळाचे सदस्य एकत्र आले. तहसील कार्यालयाजवळ जाऊन त्यांनी माने यांच्या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी माजी सरपंच भीमराव गायकवाड म्हणाले की, नागपंचमी हा शिराळ्याच्यादृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यास हजारो वर्षांची परंपरा आहे. ती पूर्ववत होण्यासाठी कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.माने यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी दि. २ जुलैरोजी आणखी ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचे सरपंच गजानन सोनटक्के, माजी जि. प. सदस्य महादेव कदम यांनी सांगितले. परंपरा व कायदा याचा समन्वय साधून केंद्र सरकारने खास बाब म्हणून नागपंचमीस नागपूजा व मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. याप्रसंगी उपसरपंच बाबासाहेब कदम, विजयराव नलवडे, संभाजी गायकवाड, उत्तम निकम, संतोष हिरगुडे, अ‍ॅड. प्रदीप जोशी, संदीप पाटील, दस्तगीर आत्तार, माजी सरपंच प्रमोद नाईक, अभिजित नाईक, सुनील कवठेकर, संजय हिरवडेकर, अविनाश खोत, केदार नलवडे, बबलू शेळके, शिवाजी शिंदे, प्रमोद पवार, महादेव कुरणे उपस्थित होते. (वार्ताहर)शिराळा येथील हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या नागपंचमीबाबत सोशल मीडियावर सर्वत्र मेसेज फिरत आहेत. नागपंचमीबाबत कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.