शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना महिनाभरात मदत

By admin | Updated: December 10, 2014 00:46 IST

जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच तहसीलदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागविण्यात येईल व महिनाभरात नियमानुसार अनुज्ञेय असलेली मदत वितरित केली जाईल,

नागपूर : जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच तहसीलदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागविण्यात येईल व महिनाभरात नियमानुसार अनुज्ञेय असलेली मदत वितरित केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.विधानसभेत आ. किसन कथोरे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देना खडसे म्हणाले, पुरात जनावरे वाहून जातात त्याचा पुरवा नसतो. त्यामुळे मदत देण्यात अडचणी येतात. यापुढे जनावरे वाहून गेली तर संबंधित जनावरांची पशुगणनेत संबंधित व्यक्तीच्या नावावर नोंद होती का हे तपासले जाईल, ग्रामसेवक व तलाठी यांची साक्ष घेतली जाईल व खात्री पटल्यानंतर मदत देण्यात यावी यावर सरकार विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. आ. कथोरे यांनी अतिवृष्टीचे निकष तालुकानिहाय ठरवू नये, अशी मागणी केली. यावर खडसे यांनी यापुढे मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्र लावणार असून अतिवृष्टीदेखील मंडळनिहाय ठरविली जाईल, अशी घोषणा केली. माळीणसारख्या गावांची माहिती मागविणारमाळीण गावाप्रमाणे टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या व भविष्यात तेथेही माळीणसारखी दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या गावांची माहिती महसूल विभागाकडून मागितली जाईल. यानंतर संबंधित गावातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन उपाय योजले जातील, अशी घोषणा महसूल, मदतकार्य व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. हितेंद्र ठाकूर यांनी डोंगराच्या कडा कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या माळीण गावाचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. नागरिकांना निवाऱ्यासाठी हक्काची जागा मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर एकनाथ खडसे म्हणाले, माळीणच्या पुनर्वसनासाठी एक जागा शोधण्यात आली होती. मात्र, गावकऱ्यांना ती जागा पसंत नव्हती. आता दुसऱ्या जागेचा शोध घेतला जात आहे. बाधित व्यक्तींना कपडे, घरगुती भांडे, खरेदीसाठी तसेच मृत जनावरांच्या मालकांना व जखमी व्यक्तींना अनुदान वाटप करण्यात आले आहे. नांदेड व लातूरच्या पाणी प्रश्नासाठी आमदारांसोबत बैठक नांदेड व लातरू जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर उपाय योजण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील आमदारांना सोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. विजय औंटी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना लोणीकर म्हणाले, पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत लातूर जिल्ह्याला २ कोटी १२ लाख रुपये व नांदेड जिल्ह्याला ४ कोटी ६ लाख रुपये देण्यात आले आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी लातूर जिल्ह्याची ५ कोटी २४ लाख रुपये व नांदेड जिल्ह्याची ७ कोटी ३९ लाख रुपयांची मागणी महसूल व वन विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)