शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा पिढीने डोळे, कान उघडे ठेवून पोलिसांची मदत करावी’

By admin | Updated: July 14, 2016 03:51 IST

मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे व काही समाजविघातक कृत्य घडले अथवा घडत असल्यास पोलिसांना त्वरित पावले उचलणे शक्य व्हावे, यासाठी युवा पिढीने डोळे

मुंबई: मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे व काही समाजविघातक कृत्य घडले अथवा घडत असल्यास पोलिसांना त्वरित पावले उचलणे शक्य व्हावे, यासाठी युवा पिढीने डोळे व कान उघडे ठेवून पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेखालील ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने ‘रिस्पॉन्सिबल युथ सेफर सिटी डायलॉग’ या कार्यक्रमांतर्गत अलीकडेच युवा पिढीचा आणि खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पोलीस आयुक्तांशी खुल्या संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी आयुक्त पडसलगीकर बोलत होते. या मुक्त संवाद कार्यक्रमात ९५ युवक-युवकांनी भाग घेतला.पोलिसांच्या कामात लोकांचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाले, तरच मुंबई शहर अधिक सुरक्षित होऊ शकेल, यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला व आजच्या ‘स्मार्ट’ तरुण पिढीने यात विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. पावसाळा संपल्यावर शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यात तरुण स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला.या मुक्त संवादाच्या निमित्ताने वाहतूक नियमांच्या पालनाच्या बाबतीत नागरिकांची बेपर्वाई, तरुणांमधील व्यसनाधिनता, मद्यसेवन करून वाहन चालविणे, तरुणांमध्ये पसरविली जाणारी कट्टरता असे अनेक विषय चर्चिले गेले. विद्यार्थी आणि युवकांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. पोलीस आयुक्तांनी या सर्वांचे म्हणणे मोकळ््या मनाने ऐकून घेतले व काही विपरित घडल्याचे कळविल्यास तत्परतेने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.नागरी जीवन आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आयोजक संस्था हाती घेत असलेल्या विविध उपक्रमांचे पडसलगीकर यांनी कौतुक केले, तसेच महिला पोलिसांच्या वॉशरूम व रेस्टरूम्सची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करून त्यातील उणिवा निदर्शनास आणून दिल्याबद्दल प्रशंसा केली. (विशेष प्रतिनिधी)