शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायवैद्यक अधिकाऱ्यांची मदत

By admin | Updated: August 11, 2015 01:29 IST

प्रभावी गुन्हा अन्वेषणासाठी महाराष्ट्रातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटांच्या तपासात थेट घटनास्थळीही सामावून घेतले जाणार आहे. शिवाय बॉम्बस्फोटानंतरच्या तपास

- डिप्पी वांकाणी,  मुंबईप्रभावी गुन्हा अन्वेषणासाठी महाराष्ट्रातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटांच्या तपासात थेट घटनास्थळीही सामावून घेतले जाणार आहे. शिवाय बॉम्बस्फोटानंतरच्या तपास प्रक्रियेच्या कृतिशील भागाचे प्रशिक्षण एनएसजी कमांडो देतील.आतापर्यंत कोणताही बॉम्बस्फोट झाल्यानंतर बॉम्ब पथक व राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी घटनास्थळाचा तपास करत असत. प्रथमच न्यायवैद्यक अधिकाऱ्यांना त्यात सामावले जाणार असून स्फोटानंतरचे अवशेष कसे गोळा करावेत हेही त्यात शिकवले जाईल. कोणताही स्फोट झाल्यानंतर तो भाग निर्मनुष्य करून फक्त एनएसजी कमांडोंना तसेच बॉम्ब रोधक पथकाला तेथे वावरण्यास मुभा दिली जाते. त्यांनी गोळा केलेले अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले जातात. त्यानंतर स्फोटकांची माहिती व बॉम्बचा स्फोट कसा करण्यात आला हेही ठरवले जाते व त्यावर आधारित अहवाल तयार करण्यात येतो. एनएसजीकडे न्यायवैद्यक प्रयोगशाळा नाही. त्यामुळे बॉम्बचे अवशेष कसे गोळा करावेत याचे प्रशिक्षण मिळालेले न्यायवैद्यक अधिकारी जर एनएसजी अधिकाऱ्याबरोबर असतील तर ही प्रक्रिया अधिक जलद होईल तसेच एवढ्या शक्तीचा स्फोट करण्यासाठी किती स्फोटके वापरली हेही लवकर स्पष्ट होईल असे महासंचालक (कायदा व तंत्रज्ञान) तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे सरसंचालक सतीश माथुर यांनी सांगितले. आयईडीची रचना व त्यात वापरलेली स्फोटके यावरुन पोलिस या स्फोटामागे कोणती संघटना असावी याचे अंदाज बांधतात. दिल्लीतील एनएसजी कमांडोंनी कार्यशाळा घेतल्यानंतर हे काम लवकर होईल.या कार्यशाळेत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे मुख्य लक्ष्य- बॉम्बची पुनर्रचना - स्फोट झालेल्या जागेचे संरक्षण कसे करावे? - स्फोट झालेली जागा पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे - स्फोटके व डिटोनेटर ओळखणे - एवढ्या क्षमतेचा स्फोट होण्याकरिता वापरलेल्या स्फोटकांचे प्रमाण ठरविणे