शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल कट्ट्या’वरून शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: November 14, 2015 03:50 IST

साने गुरुजींच्या विचारांचा पगडा असलेले काही वर्गमित्र एका सामाजिक समस्येवर तोडगा काढण्याच्या ध्येयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत

अतुल जयस्वाल/अकोलासाने गुरुजींच्या विचारांचा पगडा असलेले काही वर्गमित्र एका सामाजिक समस्येवर तोडगा काढण्याच्या ध्येयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी ‘एसजी’ नावाचा ग्रुप स्थापन केला आहे.पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील साने गुरुजी शाळेत १९८४ ते १९८८ अशी चार वर्षे सोबत शिकलेले वर्गमित्र ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून एकत्र आले. हैदराबाद येथे एका नामांकित कंपनीमध्ये व्यवस्थापक असलेले किरण गायकवाड व पुणे येथे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक असलेले सत्यजीत गायकवाड यांनी ३ आॅगस्ट २०१५ रोजी ‘एसजी’ हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप स्थापन केला. यामध्ये त्यांनी वर्गमित्रांना ‘जॉइन’ केले. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश व विदेशातही या ग्रुपचे सदस्य आहेत. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर असे एकूण ८० सदस्य या ग्रुपमध्ये आहेत.शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करायची, याबाबत व्हॉट्स अ‍ॅपवरच चर्चा केली जाते. सर्व मित्र मिळून मदतीचे स्वरूप ठरवितात. सर्व ठरल्यानंतर ग्रुपचे सदस्य शेतकऱ्याला मदत करतात, अशी माहिती मूळचे पुण्याचे व सध्या अकोला येथे सेंट्रल वेअर हाउस कॉर्पोरेशनमध्ये तांत्रिक सहायक पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत भागवत यांनी दिली.