शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा

By admin | Updated: February 15, 2015 00:53 IST

जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे.

मधुकर ठाकूर - उरणजागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे. बेटावर पर्यटकांना घेऊन लँडिंग करण्यासाठी आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित कंपनीने राज्य सरकारकडे केली आहे. उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी ही माहिती दिली.एलिफंटा बेटावरील काळ्या पाषाणातील कोरलेली अद्भुत लेणी पाहण्यासाठी दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांसाठी खासगी प्रवासी लाँच सेवा उपलब्ध आहे. तिथे पोहोचल्यापासून परतण्यापर्यंत चार-पाच तासांचा वेळ मिळतो. हा वेळ पर्यटकांना एलिफंटा बेट फिरण्यासाठी अपुरा ठरतो. या प्रवासी लाँच सेवेवर बंदर विभागाचे नियंत्रण आहे. मात्र पर्यटकांकडून परतीच्या प्रवासासह भरमसाट तिकीट दर आकारूनही त्यांना चांगली सेवा दिली जात नाही. त्यामुळे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. त्याचबरोबर पर्यटकांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचीही वानवा असते. खासगी कंपनीच्या लाँच मालकांच्या मनमानी कारभाराला पर्यटक नेहमीच बळी पडतात. त्यांना कमी वेळेत बेटावर पोहचता यावे आणि एलिफंटा बेटावरील लेणी पाहण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी गिरीसन एअरवेजने कंपनीने मुंबई ते एलिफंटा या मार्गावर हेलिकॉप्टर सेवा पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)च्सहा ते बारा आसन क्षमतेची हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडची आवश्यकता आहे. त्यासाठी किनाऱ्यावर १२ एकर जागा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. च्जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उरण तहसीलदारांकडे विचारणा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत काम सुरू असल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली. जागा उपलब्ध झाल्यास एलिफंटा बेटावर पर्यटकांसाठी लवकरच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.