शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी

By admin | Updated: July 31, 2016 04:40 IST

भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे.

नाशिक : भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे. सरकारला जनतेशी काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी लोकसभेबरोबरच विधानसभेतही भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना बाजार समितीच्या नियमन मुक्तीचा निर्णय घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत आवाज उठवूनही त्यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. कांदा लिलाव न झाल्याने कांदा उत्पादकांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई दिली पाहिजे. तसेच तत्काळ कांदा लिलाव सुरू केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्यांना महाग असलेली तूरडाळ मात्र महागड्या मॉलमध्ये स्वस्त करण्याकडे सरकारचा कल आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये कधीच कांदा प्रश्न काय किंवा अन्य सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कधीही चर्चा नसते, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)>भाजपाने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे आणला आहे. परंतु विधानसभेत असा प्रस्ताव आला तर शिवसेना, मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांबरोबरच राहतील असेही चव्हाण म्हणाले.मातोश्रीवर जाऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही भावांनी एकत्र आले तर ते ठाकरे कुटुंबाच्या दृष्टीने चांगलेच आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत अद्याप काहीही कळालेले नाही. मात्र त्यातून काही राजकीय घडामोडी आताच होतील, असे वाटत नाही, असे सांगत ठाकरे बंधूंच्या भेटीवर अशोक चव्हाण यांनी सावध पवित्रा घेतला.सब का मालिक एक म्हणून आम्हाला साईबाबांचा सहारा होता. साईबाबा शिर्डी संस्थानच्या नवीन निवडीतून विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना वगळल्याबाबत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.