शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलच्या मालमत्तेवर टाच

By admin | Updated: September 10, 2016 01:35 IST

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, तळेगाव व सोमाटणे फ ाटा परिसरातील खासगी हॉस्पिटलवर दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली.

पिंपरी : प्राप्तिकर विभागाने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, तळेगाव व सोमाटणे फ ाटा परिसरातील खासगी हॉस्पिटलवर दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली. या वेळी कोट्यवधी रुपयांच्या अघोषित मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत. संबंधित हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी करून अघोषित मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील अनेक खासगी हॉस्पिटलनी आपले उत्पन्न प्राप्तिकर विभागाला सादर केलेले नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या निगडी कार्यालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. करदात्यांना एकाच वेळी कर जमा करता येत नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने तीन टप्प्यांत कर भरता यावा, यासाठी कर प्रकटीकरण योजना जाहीर केली होती़ ही योजना १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सुरू राहणार होती.योजनेची मुदत संपत आली असतानाही मोठ्या खासगी हॉस्पिटलनी उत्पन्नाची माहिती सादर न करता अघोषित उत्पन्न लपवून ठेवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी सकाळपासून या कारवाईला सुरुवात केली़ शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली़ (प्रतिनिधी)>पिंपरी-चिंचवडमध्ये २५ हजार करदात्यांना नोटीसमालमत्ताधारक करदात्याला चालू वर्षातील अर्जित मूल्य दाखवून त्यावर कर भरावा लागणार आहे़ योजनेद्वारे करदात्यांची सर्व माहिती गुप्त ठेवली जाणार असतानाही करदात्यांनी कर थकविल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील २५ हजार करदात्यांना कर न भरल्यामुळे नोटीस पाठविली आहे़ करदात्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी कर भरला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.