शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्यांच्या संपत्तीवर टाच

By admin | Updated: August 1, 2016 04:07 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर विभागाने आणि बँकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी चालविली आहे.

मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर विभागाने आणि बँकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी चालविली आहे. मल्ल्या यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे जुने मुख्यालय किंगफिशर हाऊस, कंपनीच्या कार, कार्यालयांचे फर्निचर, मल्ल्या यांचे अलिशान जेट, गोव्यातील किंगफिशर विला आदी ७०० कोटींच्या संपत्तीचा या लिलावाच्या यादीत समावेश आहे. या संपत्तीच्या लिलावाचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या लिलावातून फार काही निष्पन्न झाले नाही. विजय मल्ल्या यांच्या खासगी जेट विमानाचा लिलाव सेवाकर विभाग, तर अन्य संपत्तीचा लिलाव बँका करणार आहेत. या बँकांचे किंगफिशर एअरलाइन्सवर किमान ९००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात व्याजाचाही समावेश आहे. यापूर्वीच्या लिलावात बोली लावणारे न आल्याने आता सर्व संपत्तीचे मूल्य काही प्रमाणात कमी करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांचा समूह किंंगफिशर हाऊससह अन्य संपत्तीचा लिलाव करणार आहे. बँकांचा हा समूह ४ आॅगस्टला किंगफिशर हाऊसचा लिलाव करणार आहे. यासाठी किमान मूल्य १३५ कोटी ठेवण्यात आले आहे. विलेपार्लेस्थित १७,००० वर्गफुटात बनलेल्या या संपत्तीसाठी यापूर्वी लिलावात १५० कोटी एवढे मूल्य ठरविण्यात आले होते; पण या मालमत्तेसाठी कोणीही पुढे आले नाही. या बँकांनी १३.७० लाख रुपयांची काही चल संपत्तीही लिलावासाठी ठेवली आहे. ही संपत्ती किंगफिशर हाऊसमध्ये पडली आहे. याचा लिलाव एसबीआय कॅप ट्रस्ट २५ आॅगस्टला करणार आहे. किंगफिशरच्या अन्य मालमत्तेची किंमत गत लिलावात ३६६ कोटी रुपये ठेवण्यात आली होती. ती किंमत आता ३३० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किंगफिशर ब्रँड जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होता तेव्हा त्याचे बाजारमूल्य ४००० कोटी रु. होते.गोव्यातील किंगफिशर विलाच्या लिलावाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; पण आॅगस्टमध्ये याचा लिलाव होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. याची किंमत अंदाजे ९० कोटी रुपये असू शकते, असे सांगितले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>१७ बँका करणार लिलाव : भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांचा समूह किंंगफिशर हाऊससह अन्य संपत्तीचा लिलाव करणार आहे. बँकांचा हा समूह ४ आॅगस्टला किंगफिशर हाऊसचा लिलाव करणार आहे. याचा होणार लिलाव जी संपत्ती लिलावात ठेवण्यात येणार आहे त्यात आठ कारचा समावेश आहे. या महागड्या कारमध्ये टोयोटा, इनोव्हा, होंडा सिटी, होंडा सिविक, टोयोटा कोरोलासह अन्य कारचा समावेश आहे. प्रत्येक कारची किंमत किमान ९०,००० रुपये ते २.५० लाख रुपयांदरम्यान आहे. आरक्षित मूल्यापेक्षा कमी दरात याची विक्री होणार नसल्याचे सांगण्यात आले.