शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खात्यात हेवेदावे

By admin | Updated: September 23, 2016 04:47 IST

मंत्रालय आगीच्या प्रकरणानंतर २६० कोटी रुपये खर्च करुन झालेल्या दुरुस्तीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे अडीच कोटीचे बिल एवढा मर्यादित हा विषय राहिलेला

अतुल कुलकर्णी,  मुंबईमंत्रालय आगीच्या प्रकरणानंतर २६० कोटी रुपये खर्च करुन झालेल्या दुरुस्तीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे अडीच कोटीचे बिल एवढा मर्यादित हा विषय राहिलेला नसून यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे आपापसातील हेवेदावे समोर आले आहेत. या प्रकरणात किती आणि कशी हेराफेरी झाली याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबी मार्फत चौकशी केल्यास अनेक बडे मासे गळाला लागतील, असे उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.सा. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सरळ दोन गट पडले असून प्रत्येक जण आपण कसे बरोबर आहेत असे सांगून आपली कातडी वाचविण्याच्या मागे लागला आहे. दोन कार्यकारी अभियंत्यांच्या वेगवेळ्या भूमिका, हे याचे उदारहण आहे. कार्यकारी अभियंता डॉ. नितीन टोणगावकर म्हणतात, राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्याचा प्रश्नच येत नाही, तर दुसरे कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे यांनी याच राजे यांना तुमचा करार झाला नसला तरी मी तुमचे पैसे मिळवून देतो असे सांगत राजे यांच्याशी शंभर रुपयांच्या बॉन्डपेपर्सवर सहा वेगवेगळे करार केले. त्यात राजे यांच्या कंपनीला दर महिन्याला साडेसात ते आठ लाख रुपये दिले जातील असे नमूद केले गेले. या कराराच्या प्रती माहिती अधिकारात दिली गेली तेव्हा तिसऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याने सरळ हात वरती करत असे करारच झालेले नाहीत, असे सांगून टाकले आहे. शिवाय, श्रावगे यांनी हे करार कशाच्या आधारे केले अशी लेखी विचारणा श्रावगे यांनाच केली आहे असेही बांधकाम विभागच म्हणू लागले आहे. दरम्यान मिळालेल्या कागदपत्रानुसार मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये राजे स्ट्रक्चरल कन्सलटंटचे हिमांशू राजे आणि त्यांचे प्रतिनिधी वेळोवेळी हजर होते, त्यांनी कामांचे सादरीकरण केले, चालू असलेल्या प्रत्येक टप्प्यावर झालेले काम योग्य आहे की नाही याचे लेखी मत नोंदवले आहे. आॅगस्ट २०१२ पासून झालेल्या अनेक बैठकांना ते हजर असल्याचे पुरावे त्यात आहेत. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी हात वरुन मोकळे झाले आहेत.