शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

By admin | Updated: July 30, 2015 02:09 IST

पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी

मुंबई : पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढत असल्याने पुढील ७२ तासांसाठी राज्यासह मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य राजस्थान आणि गुजरात लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची कायम आहे. ईशान्य बंगालचा उपसागर, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असून, त्याची तीव्रता कायम आहे. समुद्र सपाटीवर कर्नाटक किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी झाला आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. ३१ जुलै आणि १ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. २ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पडेल. पुढील ४८ तासांत मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी पडण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३०, २४ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. जलसंकट टळणार : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशय निम्मे भरले आहेत. परिणामी मुंबईत १ आॅगस्टपासून लागू होणारी १५ टक्के पाणीकपात टळण्याची चिन्हे आहेत. आता या जलाशयांमध्ये पुढील १८० दिवस पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे.