शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात दमदार पाऊस; अकोला, वाशिममध्ये वादळीवा-याने हाहाकार!

By admin | Updated: September 17, 2015 23:59 IST

अकोला जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका, वाशिममधील ढोरखेडा गावात अनेक घरांची पडझड, बुलडाण्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू.

अकोला: वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संततधार पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त होता. या जिल्ह्यातील ढोरखेडा गावातील जवळपास ४0 घरांची पडझड झाली असून, बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. अकोल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावात चक्रीवादळाने अक्षरश: तांडव केले. या गावातील सागवानाची अख्खी झाडं वादळीवार्‍यात उडताना लोकांनी पाहीली.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वादळीवारा आणि मुसळधार पावसाने ३0 ते ४0 घरांची पडझड झाली असून १३ जण जखमी झाले. सुसाट्याच्या वार्‍याने घरांवरील टिनपत्रे उडून गेले. भिंतींची पडझड झाली. काही झाडे घरांवर उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. गावातील जवळपास ३0 ते ४0 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या पडझडीत १३ जण जखमी असून, एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथे हलविण्यात आले. पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अकोल्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते.

 सकाळी ११ वाजतापासून अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात २१.0४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला. जंगलातील शेकडो सागवान झाडे मुळासकट उखडून हवेत उडताना गावकर्‍यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्ये अनेकांनी ह्ययाची डोळाह्ण पाहिली. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे चक्रीवादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले.

 पावसाने बुलडाणा जिल्ह्यातही हजेरी लावली. जळगाव जामोद तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. रसुलपूर येथील अंजनाबाई प्रकाश वानखडे (वय ५0) व तिचे पती प्रकाश वानखडे हे शेतामधून घरी जात असताना अंजनाबाईच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.