शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या मुसळधार पावसामुळे डहाणूत हाहाकार

By admin | Updated: September 22, 2016 03:18 IST

तालुक्याला रविवार पासूनच्या परतीच्या संततधारेमुळे चिंचणी, तारापुर, डहाणू खाडी, गंजाड वाणगाव या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली

डहाणू : तालुक्याला रविवार पासूनच्या परतीच्या संततधारेमुळे चिंचणी, तारापुर, डहाणू खाडी, गंजाड वाणगाव या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून डहाणू शहरात तब्बल ४५६, चिंचणी ४६०, मल्याण येथे ४५० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. डहाणु बाजार पेठेत पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे पहाटे ५ च्या सुमारास डहाणू खाडी, चिंचणी, तारापूर येथील घरात ५ फुट पाणी शिरले आहे. चिंचणी, घाचीयापाडा ,पोशेरा तलाव नागेश्वारीपाडा ,भाटीपाडा तसेच सागरी महामार्गाच्या बाजूचे पाडे चिंचणी शाळा नंबर १ येथे हलवण्यात आले. दुपारी १ च्या सुमारास भरती सुरु होणार असल्याने समुद्र किनारपट्टीच्या गावांना पुराची भीती निर्माण झाली होती. त्याकारणाने रहीवाशांनी विजेची उपकरणे, तसेच साहित्य हलवण्यासाठी धावपळ केली. वाणगाव देदाळे,वाणगाव नाका येथे पाणि भरल्याने चिंचणी गावाला पुरावा वेढा पडलेला होता. तर वाणगाव पूर्वेस पाणी साचून गुडघाभर पाण्यातून रहीवाशांना घराबाहेर पडावे लागले.गंजाड महालपाडा येथील रस्ता पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, गेल्या रविवार पासून पडणाऱ्या धो-धो पावसामूळे चिंचणी, तारापूर, धाकटी डहाणू, घाचिया, आगर, चिंचणी भाटीपाडा, सागरी महामार्ग येथील रिफाई नगर, रिफाई मोहल्ला येथील शेकडो घरांना पावसाच्या पाण्याचा तडाखा बसला असून त्यांचे संसार उघड्यावर पडला आहे. चिंचणी खाडीनाका येथे पहाटे पाच वाजताच्या सूमारास चिंचणी-तारापूर मुख्य रस्त्यावर पाणी भरले होते. त्यावेळी येथील तरूणांनी रस्त्याच्या कडेला दोन बांधून शेकडो रहदाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षात प्रथमच एवढा पाऊस झाल्याने आज पहाटेपासून सर्वत्र हाहाकार उडून घर-दार सोडून नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाले होते. (वार्ताहर)