शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकाविरोधी याचिकेवर सुनावणी आज

By admin | Updated: September 30, 2016 02:40 IST

पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यास खारघर ग्रामपंचायतीचा नकार असल्याने उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीला याचिकेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देत

मुंबई : पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यास खारघर ग्रामपंचायतीचा नकार असल्याने उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीला याचिकेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्यात येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने तसे जाहीर करत अधिसूचना काढली आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये खारघरचाही समावेश आहे. मात्र खारघर ग्रामपंचायतीचा व काही स्थानिकांचा यास विरोध आहे. पनवेल महापालिकेमध्ये खारघरचा समावेश करू नये. नवी मुंबई महापालिकेमध्येच राहून आम्ही आमचा विकास करू, असे खारघरच्या ग्रामपंचायतीने याचिकेत म्हटले आहे. मात्र ही याचिका सरकारने अधिसूचना काढण्यापूर्वी दाखल करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सरकारच्या नव्या निर्णयानुसार याचिकेत सुधारणा करा, असे निर्देश देत सर्व याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. आणखी काही नगर परिषदांचा महापालिकेत रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र याबद्दल सरकार वेळीच निर्णय घेत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाला फटका बसत आहे. निवडणुका तोंडावर आल्यावर सरकार असे निर्णय घेत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हाती घेतलेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा नव्याने हाती घ्यावा लागत आहे. त्यात श्रम आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे काम वाढत आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाच्या वतीने अ‍ॅड. सचिंद्र शेट्ये यांनी उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयाने त्यांना हे सर्व प्रतिज्ञापत्रात मांडण्याचे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)