शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील सुनावणी आज

By admin | Updated: October 13, 2016 06:48 IST

मराठा आरक्षणाविरुद्ध व आरक्षणाच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी गुरुवारी होईल. या सुनावणीत सर्व याचिकाकर्ते व प्रतिवादी

मुंबई : मराठा आरक्षणाविरुद्ध व आरक्षणाच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी गुरुवारी होईल. या सुनावणीत सर्व याचिकाकर्ते व प्रतिवादी त्यांची भूमिका लेखी स्वरूपात प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात मांडतील. गुरुवारच्या सुनावणीत उच्च न्यायालय या सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणीसाठी तारीख निश्चित करण्याची शक्यता आहे.२०१४ मध्ये सरकारने मराठा व मुस्लीम समाजासाठी अनुक्रमे १६ व पाच टक्के आरक्षण दिले. सरकारच्या या निर्णयाला केतन तिरोडकर व अन्य काही संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.कोणत्याही राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देताना म्हटले आहे. राज्य सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिल्याने, राज्यातील आरक्षणाचा टक्का ५० टक्क्यांहून अधिक असल्याने, राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा. त्याशिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. तर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे समर्थन करत, २१ व्या शतकातही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका घेतली आहे. ‘मराठा समाज आजही आर्थिक मागासलेला आहे. बहुतांशी लोक मुलांचे शिक्षण व मुलीच्या विवाहासाठी कर्ज घेतात. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मराठा समाजातील शेतकऱ्यांचे मोठे प्रमाण आहे. हे आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचा अभ्यास करण्यात आला आहे,’ असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती दिली. याविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. या याचिकांवर अंतिम सुनावणी लवकरच सुरू होईल. (प्रतिनिधी)