शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

खारघरच्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरला

By admin | Updated: October 1, 2016 01:36 IST

पनवेल महापालिकेतून वगळण्यात यावे, यासाठी खारघर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने केलेल्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

मुंबई : पनवेल महापालिकेतून वगळण्यात यावे, यासाठी खारघर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने केलेल्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. या दिवशी राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग त्यांची भूमिका उच्च न्यायालयापुढे स्पष्ट करेल.खारघर ग्रामपंचायत स्वत:चा विकास करण्यास समर्थ आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतून खारघरला वगळावे, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामसभेने उच्च न्यायालयाकडे केली आहे. ‘सरकारने अधिसूचना काढून खारघरला ‘गावा’चा दर्जा दिला आहे. त्यामुळे खारघरचा समावेश महापालिकेत करण्यापूर्वी सरकारला हा दर्जा काढून घ्यावा लागेल. त्यासाठी घटनेचे अनुच्छेद २४३ (क्यु) अंतर्गत अधिसूचना काढावी लागेल. मात्र सरकारने या कायदेशीर प्रक्रियेला बगल देत खारघरचा थेट महापालिकेत समावेश केला. हा निर्णय घटनाबाह्य असल्याने खारघरला महापालिकेतून वगळावे. आधी राज्यपालांनी अधिसूचना काढावी. सरकारला ही प्रक्रिया पार पाडण्याचा अधिकार नाही,’ असा युक्तिवाद खारघर ग्रामपंचायत व ग्रामसभेने केला.पनवेल नगर परिषदेचे महापालिकेमध्ये रूपांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी खारघर ग्रामसभेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला. ‘पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच एखाद्या नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अधिसूचनेची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी केला. खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करीत राज्य सरकारला व राज्य निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)