शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कडक कारवाईस आरोग्य संचालकांची मंजुरी !

By admin | Updated: June 5, 2016 01:07 IST

अकोल्यातील जुने शहर भागातून चालविण्यात येत असलेल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (टीएचओ) गुन्हा दाखल

- सचिन राऊत,  अकोला

अकोल्यातील जुने शहर भागातून चालविण्यात येत असलेल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (टीएचओ) गुन्हा दाखल करण्यास आरोग्य संचालकांनी शुक्रवारी रात्री मंजुरी दिली. या प्रकरणात राज्यातील ८ ते १० डॉक्टरांच्याही मुसक्या आवळण्यात येणार आहेत.जुने शहरातील वाल्मीक चौक शिवनगर येथील रहिवासी आनंद भगवान जाधवकडून संतोष शंकर गवळीने २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, संतोषने चार महिन्यात रक्कम परत न केल्याने आनंदने त्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर, किडनी देण्याच्या मोबदल्यात गवळीला आणखी पैशाचे आमिष देण्यात आले. हतबल झालेल्या गवळीने अखेर किडनी देण्याची तयारी दर्शविली.या प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर अशाच प्रकारे संतोष कोल्हटकर याचीही किडनी काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जुने शहर पोलीस स्टेशनमध्येही आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात १५ ते १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.- डॉ. सतीश पवार यांचे मार्च महिन्यात निलंबन झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य संचालकपदावर डॉ. गौरी राठोड यांची नियुक्ती झाली. किडनी तस्करी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी या प्रकरणातील दोषींवर ‘टीएचओ’ लावण्यास हिरवा कंदील दिला आहे. आरोग्य संचालकांकडून याबाबतचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त होताच या प्रकरणातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. - चंद्रकिशोर मीणा,पोलीस अधीक्षक, अकोला