शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आघाडीत पुण्यावरून बिघाडी?

By admin | Updated: January 18, 2017 06:48 IST

राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली

अतुल कुलकर्णी,

मुंबई- पुणे महापालिका निवडणुकीत जागा सोडण्यावरून राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ताठरपणाची सुरुवात मुंबईतून झाल्याचे सांगत, काँग्रेसचा हा निनावी हल्ला परतवला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते, असा रिपोर्ट गुप्तवार्ता अधिकाऱ्यांनी गृहविभागास दिला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या, तर भाजपापुढे ते आव्हान ठरू शकते, असे मत व्यक्त केले होते. यावर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘आम्ही पुणे महापालिकेत आघाडी करण्याची भूमिका घेतली, पण अजित पवार यांनी ताठरपणा कायम ठेवला आहे. थोडी समजुतीची भूमिका घेतली, तर प्रश्न मार्गी लागू शकतील,’ असेही तो नेता म्हणाला.यावर तटकरे म्हणाले, ‘काँग्रेसने मुंबईत दोन महिने आधीच ‘आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर केली. त्याला ताठरपणा म्हणायचे नाही का? त्यांच्या या भूमिकेमुळेच आम्ही मग मुंबईत आमच्या काही उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. आमची राज्यभर आघाडी करण्याची भूमिका आहेच, पण दोघांनीही एका पातळीवर येऊन तातडीने चर्चा केली पाहिजे,’ असे तटकरे म्हणाले. या बैठकीबद्दल विचारले असता, अशोक चव्हाण आघाडीचे निर्णय जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य ते प्रस्ताव पाठवल्यास आम्ही त्याला होकारच देऊ. वास्तवाची जाणीव ठेवून निर्णय घेतले जातील, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारदेखील आघाडीबद्दल सकारात्मक असल्याचे चव्हाण म्हणाले.काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीसोबत जायचे की नाही, असे थेट विचारले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी बघा, सगळ्यांचे काय मत आहे तसे करा, असे गोलमोल उत्तर दिल्याचे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवर जुना राग आहे, पण आता रागलोभाच्या पलीकडे जाऊन निवडणुकांकडे पाहावे लागेल, असे सांगून व्यावहारिक भूमिका घ्यावी लागेल, असे मत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांंनी मांडल्याचे समजते.