शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

कृत्रिम तापमान तयार करुन 'त्याने' नागाच्या ३४ पिल्लांचा घडवला जन्म

By admin | Updated: July 6, 2016 14:18 IST

कृत्रिम तापमान तयार करुन नगर शहरातील सर्पमित्र आकाश जाधव यांनी तब्बल ३४ नागांच्या पिलांना जन्मदान देत निसर्गात मुक्त केले आहे.

अरुण वाघमोडे, ऑनलाइन लोकमत अहमदनगर, दि. ६ -  कृत्रिम तापमान तयार करुन नगर शहरातील सर्पमित्र आकाश जाधव यांनी तब्बल ३४ नागांच्या पिलांचा जन्म घडवून आणला. याची जाधव यांनी वनविभागात नोंदही केली आहे़.

४२ दिवसांपूर्वी शहरातील बुरुडगाव येथे घरकामासाठी पाया खोदत असताना इंडियन कोब्रा जातीच्या नागाची ४२ अंडी आढळून आली़ यातील दहा ते बारा अंडी फुटली़ याबाबत परिसरातील नागरिकांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सोशल वर्क सोसायटीचे सर्पमित्र आकाश जाधव यांना माहिती दिली.

जाधव यांच्यासह संस्थेचे अतुल पाखरे, नवाज शेख, समीर शेख यांनी घटनास्थळी जाऊन अंडी ताब्यात घेतली़ तसेच त्या अंड्यांसाठी एक लागडी पेटी तयार केली़ त्यामध्ये ३० ते ४० डिग्री तापमान लाईटद्वारे दिले़ जाधव दर दोन दिवसांनी त्या अंड्यांची तपासणी करत होते. ४२ दिवसानंतर यातील ३४ अंडी फुटून ३४ जिवंत नागांच्या पिल्लांनी जन्म घेतला़. सर्प जमिनीतील बिळात अंडी देतात त्यामुळे ती अंडी उबविण्याला नैसर्गिक तापमान मिळते़ ही अंडी जमिनीच्या बाहेर काढल्याने ती उबविण्यासाठी जाधव यांना कृत्रिम तामपान द्यावे लागले़. 

जन्माताच विषारी  मे-जुलै महिन्यात नागाची मादी उंदराच्या बिळात किंवा मुंग्या नसतील अशा ठिकाणी वारुळात अंडी घालते़ एक मादी ३० ते ६० अंडी देऊ शकते़ या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी ६० ते ६२ दिवसांचा कालावधी लागतो़ तोपर्यंत अंड्यांचे रक्षण करण्यासाठी मादी तेथेच राहते़ नागाची पिल्ले जन्मताच विषारी असतात़ अंड्यातून बाहेर आल्यानंतर ही पिल्ले एक ते दोन आठवड्यानंतर दुसरीकडे निघून जातात़ किटक, सरडे, पाली, बेडूक, मंडमे व लहान बिनविषारी साप हे नागाचे भक्ष्य असल्याचे जाधव यांनी सांगितले़ 

१० वर्षात पकडले ४ हजार नागसर्पमित्र आकाश जाधव यांनी सातारा येथे वाईल्डलाईन प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेत सर्पाविषयी प्रशिक्षण घेतले आहे़ ते समाजात सार्पाविषयी प्रबोधन करतात़ गेल्या दहा वर्षात त्यांनी चार हजार सर्पांना पकडून निसर्गात मुक्त केले आहे़ तसेच सापांविषयी समाजत विविध गैरसमज असून, जाधव हे याबाबत लोकांचे प्रबोधन करतात़