शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद..! मायलेकीची विवस्त्र करून घेतली झडती

By admin | Updated: February 23, 2016 03:35 IST

चोरीच्या संशयातून दलित समाजातील मायलेकींना भर रस्त्यावर सुमारे दोनशे लोकांसमोर विवस्त्र करून त्यांची झडती घेण्याचा घृणास्पद प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला.

इंदापूर (जि. पुणे) : चोरीच्या संशयातून दलित समाजातील मायलेकींना भर रस्त्यावर सुमारे दोनशे लोकांसमोर विवस्त्र करून त्यांची झडती घेण्याचा घृणास्पद प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित महिला फरारी असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी दिली. आरोपी श्रीरंग दादू शेंडगे (वय ६१ वर्षे) याला सोमवारी पहाटे ५च्या सुमारास अटक करण्यात आली. मुख्य संशयित महिला चतुराबाई श्रीरंग शेंडगे (वय ५५ वर्षे, दोघे रा. कचरेवाडी, ता. इंदापूर) ही फरारी आहे.अंथुर्णे येथील महिलेने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडित मायलेकी आठवडे बाजारात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतात. रविवारी इंदापूरच्या आठवडे बाजारात भाजीविक्री करून त्या दोघी सहा आसनी रिक्षातून घरी निघाल्या होत्या.या रिक्षात बसलेल्या महिलेच्या हातातील छत्री मुलीला लागत असल्याने दोघी त्यातून उतरून दुसऱ्या रिक्षामध्ये बसून निमगाव केतकीच्या दिशेने निघाल्या. इंदापूर - बारामती रस्त्यावरील वरकुडे खुर्द गावाजवळ पहिल्या रिक्षाने त्या दोघी बसलेल्या रिक्षाला थांबविले. चतुराबाई हिने मुलीला खाली ओढून ‘माझ्या गळ्यातील डाग चोरला आहे’ असा आरोप केला. दरम्यान फोन करून तिने कचरेवाडी आणि परिसरातील परिचितांना बोलावून घेतले. जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. यावळी दीडशे ते दोनशे लोक जमा झाले. गर्दीतील एकाने दोघींना नग्न करा, असे म्हणत मारहाण सुरू केली. रस्त्यावरच मुलीच्या अंगावरील कपडे आणि या महिलेची साडी काढून झडती घेण्यात आली. जवळची पर्स आणि पिशवीही तपासली. मायलेकी पोलिसांकडे जाऊया, म्हणत असताना त्याकडे दुर्लक्ष केले. या दोघींकडे काहीही सापडले नाही, त्यामुळे ‘आपण प्रकरण मिटवून घेऊ’ असे चतुराबाईने म्हटल्यावर सर्वांनी पोबारा केला. त्यानंतर रात्री दोन वाजता याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली. (प्रतिनिधी)गुन्हा दाखलपोलीस निरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले, ‘‘झडती घेण्याचा प्रकार घडला असला तरी या दोघींना विवस्त्र केले होते किंवा नाही हे पुढील तपासात निष्पन्न होईल. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तसा गुन्हा दाखल केला आहे.’’