शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

हरियाणाचे पाच पोलीस निलंबित

By admin | Updated: June 5, 2016 01:16 IST

हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणी कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या हरियाणाच्या गुरगांव पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. २८ मे रोजी यातील पाच

मुंबई : हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणी कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या हरियाणाच्या गुरगांव पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. २८ मे रोजी यातील पाच पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच कोर्टाने या पोलिसांना अटक करण्याबाबत हिरवा कंदील दाखविल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. भूमिगत झालेल्या गुडगाव पोलिसांना शरण येण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्टवर ७ फेब्रुवारी रोजी हरियाणातील गुरगाव पोलिसांच्या पथकाने संदीप गडौली याचा एन्काउंटर केला होता. गडौली एन्काउंटरबाबत हरियाणा पोलिसांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने, त्यांचा ताबा घेऊनच त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर, यातील सत्य बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने, या प्रकरणी अनेकदा हरियाणा पोलिसांच्या गुरगांव काइम ब्रँचच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, त्यांनी मुंबई पोलिसांना कोणत्याही प्रकारे सहकार्य न करता, हजेरी लावली नाही. याउलट गडौलीच्या कुटुंबीयांनी हरियाणा पोलिसांच्या एन्काउंटर विरोधात न्यायालयात दाद मागितली असता, याचा एसआयटीने तपास करण्यास सुरुवात केली होती. या वेळी गडौलीच्या वतीने कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचा उल्लेख अहवालात एसआयटीने करून अहवाल सादर केला होता. बॅलेस्टिक रिपोर्टमध्येदेखील सर्व काडतुसे ही पोलिसांच्या शस्त्रामधून फायर झाल्याचे नमूद करण्यात आल्याने, गडौली एन्काउंटर हा पूर्णत: बनावट असल्याचे शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर, न्यायालयाने हरियाणा पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरगांव काइम ब्रँचने गडौलीविरोधात दाखल केलेला गुन्ह्यातील ३०७ कलम (हत्येचा प्रयत्न) काढून, मुंबई पोलिसांनी ३०२ आणि १२० बी (हत्या आणि काइम कॉन्ट्रव्हर्सी) हे कलम हरियाणा पोलिसांविरोधात दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या गुडगाव पोलिसांच्या अटक वारंटच्या अर्जाबाबत न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. मात्र, याच प्रकरणातील दोषी पोलिसांवर २८ मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना शरण येण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)दिव्या अहुजा गुन्हे शाखेच्या ट्रॅकवर- गुडगावमध्ये गुन्हेशाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडौलीची गलफ्रेंड असलेली मॉडेल दिव्या अहुजा मिसिंग असल्याचे वृत्त पसरत होते. याबाबत मिसिंग तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, ती सुरुवातीला गोवा येथे काही दिवस होती. त्यानंतर, ती सध्या कोठे आहे किंवा काय करत आहे, याबाबत गुन्हे शाखा गेल्या आठवड्यापर्यंत तिच्यावर वॉच ठेऊन असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.