शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

चतुरस्त्र मराठी अभिनेत्री वंदना गुप्तेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By admin | Updated: July 16, 2016 13:44 IST

मराठी नाटकं व चित्रपटात विविध भूमिका करणा-या चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १६ - ‘अभिनेत्री’, ‘चारचौघी’, ‘अखेरचा सवाल’, ‘ज्याचा त्याचा प्रश्ना’, ‘सुंदर मी होणार’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘श्री तशी सौ’, ‘सोनचाफा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अनेक नाटके व चित्रपटांमध्ये काम करणा-या चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा आज (१६ जुलै) वाढदिवस. 
वंदना गुप्ते यांच्या अनेक नाटकांमधील  भूमिका गाजल्या मात्र खरी ओळख मिळाली ती ‘अखेरचा सवाल’ या नाटकानं. अरुण जोगळेकर, दया डोंगरे, दत्ता भट या मंडळींबरोबरच विजया मेहताही या नाटकात काम करत होत्या. कर्करोगग्रस्त नंदू नावाच्या मुलीची ती भूमिका होती. चाळीस वर्षांपूर्वी हे नाटक आलं होतं. ती स्वतः खेळाडू असते आणि तिची आई डॉक्टतर असते. अनेकदा खेळता खेळता तिच्या पोटात दुखतं. ती मैदानावर कोसळते. त्यानंतर लक्षात येतं की तिला कर्करोग आहे ते. मात्र तिचे आई-वडील तिला हे सांगत नाहीत. पण नंतर तिला ते कळतं. मग ती आईला सांगते की कशाला खर्च करते आहेस. मला माहीत आहे मला काय झालं आहे ते. या नाटकात विजयाबाईंनी आईची भूमिका साकारली. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं ‘सोनचाफा’ हे नाटक फार गाजले. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकात काम केल्यामुळे एका स्वाभिमानी स्त्रीचं जगणं कसं असतं, ह्यात एका स्वाभिमानी स्त्रीची ही भूमिका होती. चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महेश मांजरेकर यांच्या ‘मातीच्या चुली’ या चित्रपटात त्यांचा सहज सुंदर अभिनय आपल्याला बघायला मिळाला, खरं तर ‘पसंत आहे मुलगी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका मा.माणिक वर्मा तिच्या आई होत. वंदना गुप्ते यांनी अभिनयाच्या क्षेत्रात विविध माध्यमातून लोकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केले आहे. 
मा.वंदना गुप्ते यांनी चित्रपटापेक्षा नाटकांत अधिक कामे केलीआहेत. त्यांनी ५९ नाटके केली आहेत व विविध नाटकांचे दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. सुयोग, चंद्रलेखा, श्री चिंतामणी अशा नामांकित नाट्यसंस्थांमध्ये काम केलं आणि आताही करीत आहेत.
मा.वंदना गुप्ते यांना लोकमत समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.