शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

असे घडले एफटीआयआयचे आंदोलन

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

‘एफटीआयआय’ही कलेचा वारसा जपणारी अत्यंत जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची

पुणे : ‘एफटीआयआय’ही कलेचा वारसा जपणारी अत्यंत जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ व्या दिवसापर्यंत केलेल्या आंदोलनाने देशाचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाचा घेतलेला हा आढावा... १० जून : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाची पुनर्रचना, अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड१२ जून : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे गजेंद्र चौहान व सदस्यांच्या निवडीविरोधात आंदोलन सुरू१६ जून : आमदार नीतेश राणे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट२३ जून : प्रसिद्ध अभिनेते टॉम आॅल्टर यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, चौहान यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला.१ जुलै : विद्यार्थ्यांचा मोर्चा३ जुलै : एफटीआयआयचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांचे पहिले शिष्टमंडळ केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला रवाना. विद्यार्थी व सरकार यांच्यातील पहिली बैठक निष्फळ६ जुलै : प्रसिद्ध दिग्दर्शक जहानू बरूआ व पल्लवी जोशी यांचा नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा७ जुलै : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, मध्यस्थी करण्याची तयारी.९ जुलै : विद्यार्थ्यांचा कोर्टात जाण्याचा इशारा१५ जुलै : संचालकांची विद्यार्थ्यांना कारवाईची नोटीस१७ जुलै : डी. जे. नारायण यांचा संचालकपदाचा कार्यकाळ संपला, प्रशांत पाठराबे संचालकपदी१७ जुलै : ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट२० जुलै : संस्थेचे कर्मचारी संजय चांदेकर व विद्यार्थी यांच्यात बाचाबाची२१ जुलै : प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेसच्या प्रवक्त्या नगमा यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट२५ जुलै : एफटीआयआयच्या काही प्रथितयश माजी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू ३१ जुलै : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांना पाठिंबा. सरकारवर टीका३ आॅगस्ट : दिल्ली मार्च संपाला आंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने देशभर वेगवेगळ्या संस्था, विद्यापीठ, नावाजलेली महाविद्यालये इथे जाऊन बाजू मांडायला सुरुवात. पथनाट्ये, कविता, लेख, कलाकृती, पेंटिंग्ज, शॉर्ट फिल्म्स, कार्टून्स या सर्वांच्या माध्यमातून अभिव्यक्तीचा प्रयत्न. ‘चलो दिल्ली’चा नारा. ६ आॅगस्ट : अध्यक्ष नियुक्ती व आंदोलन दोन्हीही निरर्थक, राज ठाकरे यांची टीका७ आॅगस्ट : वसतिगृह सोडण्याचे संचालकांचे विद्यार्थ्यांना आदेश१० आॅगस्ट : संस्था सोडणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका११ आॅगस्ट : कलाकारांच्या सह्यांचे निवेदन मंत्रालयाला१७ आॅगस्ट : संचालकांना विद्यार्थ्यांचा घेराव१८ आॅगस्ट : एफआयआर आणि विद्यार्थ्यांना अटक२१ आॅगस्ट : सरकारतर्फे खान समितीची संस्थेला भेट३१ आॅगस्ट : ८२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले०१ सप्टेंबर : कर्मचारी कामावर रुजू०८ सप्टेंबर : प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजू हिरानी यांचा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार१० सप्टेंबर : विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू१६ सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, गजेंद्र चौहान यांच्यावर टीका१९ सप्टेंबर : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण२२ सप्टेंबर : आंदोलनाला शंभर दिवस उलटून गेल्यानंतरही काहीच तोडगा निघत नसल्याने खान समितीने विद्यार्थी, प्रशासनाला धारेवर धरले.२३ सप्टेंबर : पल्लवी जोशी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट२८ सप्टेंबर : विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले२९ सप्टेंबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ१ आॅक्टोबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ६ आॅक्टोबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ१९ आॅक्टोबर : उच्च न्यायालयाची विद्यार्थी, संस्था, राज्य व केंद्र सरकारला नोटीस२० आॅक्टोबर : माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड आणि विद्यार्थी यांच्यातील पाचवी बैठक निष्फळ. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती मुद्दा महत्त्वपूर्ण नाही, राठोड यांचे वक्तव्य.२८ आॅक्टोबर : १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे.