शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान नगरसेवकांवर टांगती तलवार

By admin | Updated: October 3, 2016 05:49 IST

काही महिन्यांवर आल्या असल्या, तरी आपला वॉर्ड कायम राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने मुंबईतील नगरसेवक कातावले आहेत.

गौरीशंकर घाळे,

मुंबई- महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या, तरी आपला वॉर्ड  कायम राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने मुंबईतील नगरसेवक कातावले आहेत. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडून महिला व मागासवर्गीय जागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर प्रभाग फेररचनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून, ८० टक्के जागांवर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी पालिकेतील २२७ जागांपैकी महिला आणि मागासवर्गीय जागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील ५० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतात, तर लोकसंख्येच्या आधारावर यंदा अनुसूचित जातींसाठी १५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या लॉटरीत आपला पत्ता कापला जाऊ नये, यासाठी उमेदवारांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले आहेत. त्यातच प्रशासनाने केलेल्या फेररचनेमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग बदलले जाण्याची शक्यता आहे. तब्बल ८० टक्के नगरसेवकांना विद्यमान आणि हक्काचे मतदार गमवावे लागणार आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या राजकारणावर पाणी पडल्याची भावना नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षे जो मतदार सांभाळला, त्यांना सोडून आता नव्याच मतदारांना खूश करण्याची धडपड उमेदवारांना करावी लागणार आहे. आज आरक्षणाची सोडत झाल्यानंतर, ५ तारखेला फेररचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. ५ ते २० आॅक्टोबरपर्यंत या फेररचनेबाबत सूचना आणि तक्रारी करता येणार आहेत. यावर ५ नाव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेतली जाईल. १८ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून फेररचनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, २२ नोव्हेंबरला फेररचनेची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. सूचना-तक्रारींची सोय असली, तरी आयोगाकडून प्रसिद्ध होणारी पहिली यादी निहीत प्रक्रियेत असते. त्यात नंतर फार मोठे बदल होण्याची शक्यता नसते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

>मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान

उपनगरातील केवळ १५ प्रभागच मागील निवडणुकीप्रमाणे राहणार आहेत. त्यात कसलाच फेरबदल नसणार. या व्यतिरिक्त तब्बल २५ ते ३० प्रभागांच्या रचनेत ८० टक्क्यांपर्यंत बदल सुचविण्यात आला आहे, तर उर्वरित सर्व जागांवर ३५ ते ४० टक्के बदल आहेत.